निर्भया : दोषींच्या कुटुंबीयांची राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची मागणी
Updated On:

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी चारही आरोपीना फाशी ठोठावण्यात आली आहे. फाशीची शिक्षा होऊ नये म्हणून आरोपी आपले अधिकार वापरण्याचा प्रयत्न करीत आहे.
दरम्यान, आता निर्भया प्रकरणातील दोषींच्या कुटुंबियांनी इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रपतीकडे केली आहे.
तुम्ही आमच्या मुलांची दया याचिका नाकारली आहे, आता आम्हालाही इच्छा मरणाची परवानगी द्या; असे दोषींच्या कुटुंबीयांनी अर्जात म्हंटले आहे.





