पुणे जिल्हा | अठरा तासांत एकोणीस गड केले सर

पौड, (वार्ताहर) – श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन गड किल्ले सर करण्यास केलेली सुरूवात कमी कालावधीत जास्त गड सर करण्याचा केलेला निर्धार हा एकोणीस गड किल्ले सर करण्यासाठी सरासरी अठरा तास इतका कालावधीत पूर्ण केला. यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी दशरथ हब्बु यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे बुक, ओळखपत्र, प्रशस्तीपत्र व मेडल देऊन सन्मानित केले आहे.
हब्बू हे गेल्या 15 वर्षांपासून ट्रेकिंग करत असून सह्याद्रीकडे लक्ष केंद्रित करुन महाराष्ट्रातील कठीण श्रेणीतील मोरोशीचा भैरवगड, ट्रेकर लोकांची पंढरी समजला जाणारा -चघ म्हणजेच अलंग, मदन, कुलंग, हरिशचंद्र गड, गोरखगड, किल्ले हरिहर, जीवधन वरून वणारलिंगी सुळका रॅपलींग, प्रबळ गड, विशाल गड, अलंग, मानग, कुलंग,
रायगड रायगड प्रदिक्षणा मॅरॅथॉन, लोहगड, तुंग असे अनेक किल्ले सर केले तसेच महाराष्ट्रबाहेरील गोवा, गुजरात, दीव दमण येथील किल्ले सर केले आहे. असे आत्तापर्यंत 179 पेक्षा जास्त किल्ले सर केल्याचे दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले.





