New Zealand Squad : भारत-न्यूझीलंड T20I मालिकेसाठी अचानक संघात बदल, 2 स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर
New Zealand Squad : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २२ ऑक्टोबरपासून पाच टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेपूर्वी दोन स्टार खेळाडू जखमी झाल्याने संघात बदल करण्यात आले आहेत.

New Zealand Squad Changes India T20I Series Chapman Foulkes Ruled Out : वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मैदानांवरील टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ थेट न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. २२ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या पाच सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी-२० मालिकेसाठी दोन्ही देशांनी आपले संघ आधीच जाहीर केले होते. मात्र, मालिकेची पहिली लढत सुरू होण्यापूर्वीच यजमान संघाला मोठा झटका बसला आहे. दुखापतींच्या गंभीर समस्येमुळे यजमानांना आपल्या मुख्य संघात दोन महत्त्वाचे बदल करणे भाग पडले आहे.
चॅपमॅन अन् फाउल्क्स दुखापतग्रस्त; संपूर्ण मालिकेला मुकणार!
न्यूझीलंडचा स्फोटक मधल्या फळीतील फलंदाज मार्क चॅपमॅन आणि युवा वेगवान गोलंदाज जॅक फाउल्क्स दुखापतींमुळे संपूर्ण टी-२० मालिकेतून बाहेर पडले आहेत. गेल्या महिन्यात युरोपियन टी-२० लीग खेळताना चॅपमॅनच्या डाव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती; तो एकदिवसीय मालिकेपूर्वी तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, कॅन्टरबरी संघाच्या सराव सत्रादरम्यान फाउल्क्सच्या उजव्या हिप फ्लेक्सरला दुखापत झाली असून वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.
जोश क्लार्कसन आणि ब्लेअर टिकनरला मिळाली संधी!
An update to our T20I squad ahead of the Hero VIDA T20I Series Powered by AI+ Nova Smartphone against India, starting at Hagley Oval on October 22.
More | https://t.co/dqTGczJrkV 📲 https://t.co/BeU2146DXX
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 9, 2026
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने या दोन्ही खेळाडूंच्या बदली खेळाडूंची घोषणा केली आहे. अष्टपैलू जोश क्लार्कसन आणि अनुभवी वेगवान गोलंदाज ब्लेअर टिकनर यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारताविरुद्ध स्वतःची छाप पाडण्यासाठी या दोन्ही खेळाडूंसाठी ही मोठी सुवर्णसंधी मानली जात आहे. कर्णधार मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली आता हा नवा संघ मैदानात उतरेल.
२२ ऑक्टोबरपासून क्राइस्टचर्चमध्ये महामुकाबला!
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात भुवनेश्वर कुमार, संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशी यांसारखे स्टार्स सज्ज आहेत. न्यूझीलंडमधील या मालिकेत दोन्ही संघ तोडीस तोड दिसत असले, तरी चॅपमॅन आणि फाउल्क्सची अनुपस्थिती किवी संघासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते.





