Maharashtra Politics : मोठी बातमी..! महाराष्ट्रात नव्या राजकीय पक्षाची घोषणा; ‘या’ बड्या नेत्यानं फुंकलं रणशिंग
Maharashtra Politics : हाके यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घोषणा करत नव्या राजकीय पक्षाची स्थापना करणार असल्याचे जाहीर केले आहे.

Maharashtra Politics : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घोषणा करत नव्या राजकीय पक्षाची स्थापना करणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘ओबीसी जनता पार्टी’ असे या नव्या पक्षाचे नाव असणार असून, ओबीसी समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी आगामी निवडणुका लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (Maharashtra Politics)
लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, राज्यातील ओबीसी समाजाचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि त्यांना स्वतंत्र राजकीय व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Politics)
यावेळी त्यांनी भाजपवरही टीका केली. “भाजपचा डीएनए आता ओबीसींचा राहिलेला नाही, तो कारखानदारांचा झाला आहे,” असा आरोप करत त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, सत्तेत आल्यानंतरही इतर पक्षांतील नेत्यांची फोडाफोड का केली जाते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (Maharashtra Politics)
वारीच्या पार्श्वभूमीवर बोलताना हाके म्हणाले, “पांडुरंगाकडे माझी एकच प्रार्थना आहे की, महापूजेला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळावी आणि पक्षफोडीचे राजकारण थांबावे. आता सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर काम करण्याची वेळ आली आहे.” (Maharashtra Politics)
राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका करताना त्यांनी पक्षाने ओबीसी समाजासाठी ठोस लढा उभारला नसल्याचा आरोप केला. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष सत्तेच्या राजकारणातच गुंतले असून, त्यांच्यात मूलभूत फरक नसल्याचा दावाही त्यांनी केला. (Maharashtra Politics)
लक्ष्मण हाके यांच्या या घोषणेमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Politics)
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; महिला नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ






