Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; महिला नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Politics : नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे.

Maharashtra Politics : नवी मुंबईच्या राजकारणात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख पूजा बनसोडे यांना एका भंगार व्यावसायिकाकडे 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून तुर्भे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात त्यांच्यासह आणखी तिघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित आरोपी सध्या फरार आहेत. (Maharashtra Politics)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तुर्भे परिसरातील एका भंगार व्यावसायिकाकडे दोन लाख रुपयांची मागणी केली होती. व्यावसायिकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याला कथितरित्या शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. (Maharashtra Politics)
या प्रकरणानंतर संबंधित व्यावसायिकाने तुर्भे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पूजा बनसोडे आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांविरोधात खंडणीसह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला. (Maharashtra Politics)
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पूजा बनसोडे यांना ताब्यात घेऊन अटक केली. मात्र, या प्रकरणातील इतर तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमुळे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, प्रकरणाचा पुढील तपास तुर्भे पोलीस करत आहेत. (Maharashtra Politics)
Eknath Shinde : “विकासासाठी मतदारसंघांची पुनर्रचना आवश्यक”; एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
Eknath Shinde : आंदोलनाला पाठिंबा हा राजकीय अजेंडा.! एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका






