NEET Paper Leak : नीट पेपर फुटीप्रकरणात राजस्थान पोलिसांनी नाशिकमधील एका तरुणाला ताब्यात घेतले असून या प्रकरणात मोठ्या आर्थिक व्यवहारांची माहिती समोर आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव शुभम खैरनार असे असून तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील गंगाधरी गावचा रहिवासी आहे. (NEET Paper Leak) सूत्रांच्या माहितीनुसार, शुभम खैरनारने नीटची प्रश्नपत्रिका १० लाख रुपयांत विकत घेतली आणि ती तब्बल १५ लाख रुपयांत विकल्याचा आरोप आहे. त्यानंतर ही प्रश्नपत्रिका इन्स्टाग्रामसह सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचेही समोर आले आहे. (NEET Paper Leak) आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी डोक्यावरील केस कापून पेहरावात बदल केला होता. मात्र, पोलिसांनी शिताफीने त्याला नाशिकमधील इंदिरानगर परिसरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला राजस्थान पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. (NEET Paper Leak) BAMS विद्यार्थी, विद्यार्थ्यांना करत होता काऊन्सिलिंग ३० वर्षीय शुभम खैरनार हा BAMS चा विद्यार्थी असून तो नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काऊन्सिलिंग करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात त्याचे नाव आल्यानंतर कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे. शुभमचे वडील डॉ. मधुकर खैरनार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आमचा मुलगा निर्दोष आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तो नाशिकमध्ये BAMS ची प्रॅक्टिस करत आहे. त्याचा या प्रकरणाशी काही संबंध नसावा. तरीही चौकशी व्हावी.” (NEET Paper Leak) देशभरातून १६ संशयित ताब्यात नीट पेपर फुटीप्रकरणी देशभरातून आतापर्यंत १६ संशयित आरोपींना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरा संशयित आरोपी हा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील असून सध्या पुण्यात राहत असल्याचे समजते. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेली NEET परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आली असून देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. (NEET Paper Leak)