Neeraj Chopra Honor : गोल्डन बॉयने इंडियन आर्मीची सोडली साथ! ‘या’ कारणामुळे दिला राजीनामा

Neeraj Chopra Resigns from Army for Honorary Lieutenant Colonel Rank : भारताचा गोल्डन बॉय म्हणजेच स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा, सतत चर्चेत असतो. अलिकडेच, नीरजला त्याच्या नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धेत पाकिस्तानच्या सध्याच्या ऑलिम्पिक चॅम्पियन अर्शद नदीमला आमंत्रित केल्याबद्दल बरीच टीकेला सामोरे जावे लागले. आता नीरज त्याच्या एका निर्णयामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. खरंतर नीरजने भारतीय सैन्यातून राजीनामा दिला आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक आणि पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा नीरज चोप्रा गेल्या ९ वर्षांपासून भारतीय सैन्याशी संबंधित होता. नीरजला दोन वर्षांपूर्वीच सुभेदार मेजर पदावर बढती मिळाली होती. भारतीय सैन्याच्या राजपुताना रायफल्सचा भाग असलेले नीरज चोप्रा हा यापूर्वी सुभेदार पदावर कार्यरत होता. त्यानंतर टोकियो ऑलिम्पिकच्या यशानंतर त्याला बढती देण्यात आली.
प्रादेशिक सैन्यात मिळाली बढती –
🚨 Olympic Multi Medalist Neeraj Chopra has been conferred the Honorary Rank of Lieutenant Colonel in the Indian Territorial Army 🇮🇳🫡 pic.twitter.com/IcNDz4RL4I
— The Khel India (@TheKhelIndia) May 14, 2025
आता २०१६ पासून भारतीय सैन्यात असलेल्या नीरजने अलीकडेच राजीनामा दिला. खरंतर, नीरजने हे केले कारण त्याला राष्ट्रपतींनी भारताच्या प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलचा मानद पद बहाल केले आहे. ९ मे रोजी राष्ट्रपतींनी नीरजला हा विशेष सन्मान देण्यासाठी अधिसूचना जारी केली. अधिसूचनेनुसार, नीरज चोप्राची ही रँक १६ एप्रिल २०२५ पासून लागू मानली जाईल.
हेही वाचा – IPL 2025 च्या उर्वरित हंगामासाठी नवा नियम जाहीर! संघांची होणार कोंडी, काय आहे नियम?
राजीनामा का द्यावा लागला?
आता प्रश्न असा आहे की नीरज चोप्राला राजीनामा का द्यावा लागला? खरं तर, सैन्यात (आणि इतर सरकारी सेवांमध्ये) स्पष्ट नियम आहेत की एकाच वेळी दोन वेगवेगळी पदे आणि सेवा धारण करता येत नाहीत. नीरजच्या बाबतीत, तो लष्करात सुभेदार मेजर असताना प्रादेशिक सैन्यात मानद लेफ्टनंट कर्नल राहू शकत नव्हता. त्यामुळे त्याला सैन्यातील नोकरीचा राजीनामा द्यावा लागला.
हेही वाचा – Delhi Capitals : ३ सामन्यांसाठी ६ कोटी? दिल्लीने मुस्तफिजूर रहमानसाठी उघडली तिजोरी
नीरज २०१६ मध्ये भारतीय सैन्यात सामील झाला. तेव्हा तो नायब सुभेदार या पदावर होता आणि त्यानंतर त्याला सुभेदार या पदावर बढती देण्यात आली. टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर, त्याला सैन्याने परम विशिष्ट सेवा पदक देऊन सन्मानित केले आणि सुभेदार मेजर पदावर बढती देण्यात आली.





