IPL 2025 च्या उर्वरित हंगामासाठी नवा नियम जाहीर! संघांची होणार कोंडी, काय आहे नियम?

IPL 2025 New Replacement Rule Impact : आयपीएल २०२५ च्या उर्वरित हंगामासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एका आठवड्याच्या स्थगितीनंतर, आयपीएलच्या १८ व्या हंगामाचा उत्साह १७ मे पासून पुन्हा सुरू होणार आहे. उर्वरित सामने आता फक्त सहा शहरांमध्ये आयोजित केले जातील. आता जेतेपदाचा सामना २५ मे ऐवजी ३ जून रोजी खेळवला जाईल. पण, सुरक्षेच्या कारणास्तव, परदेशी खेळाडू मायदेशी परतले आहेत आणि बरेच खेळाडू पुन्हा सहभागी होण्यासाठी परत येत नाहीत. त्यामुळे याबाबतच्या एका नियमात बदल केला आहे.
आता परदेशी खेळाडूंच्या बदलीचा टप्पा सुरू झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने जेक फ्रेझर मॅकगर्कच्या जागी मुस्तफिजूर रहमानचा संघात समावेश केला आहे, ज्याने उर्वरित सामन्यांमध्ये खेळण्यास नकार दिला होता. बीसीसीआयने परदेशी खेळाडूंच्या बदलीबाबत एक नवीन नियम जाहीर केला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या या नव्या नियमामुळे संघांचे मोठे नुकसान होऊ शकते. काय आहे कारण? जाणून घेऊया.
काय आहे नवीन नियम?
View this post on Instagram
नवीन नियमानुसार, स्थगितीनंतर आयपीएल २०२५ च्या उर्वरित हंगामातील सामन्यांसाठी सामन्यांसाठी, ज्या खेळाडूंना रिप्लेसमेंट म्हणून संघात सामील केले आहे, त्या खेळाडूंना पुढील हंगामासाठी रिटेन करता येणार नाही. मात्र आयपीएल २०२५ स्थगित होण्यापूर्वी ज्या खेळाडूंना रिप्लेसमेंट म्हणून संघात सामील केले आहे, त्यांना पुढील हंगामासाठी रिटेन करता येणार आहे. या नियमामुळे बऱ्याच संघांचे नुकसान होणार आहे.
हेही वाचा – Delhi Capitals : ३ सामन्यांसाठी ६ कोटी? दिल्लीने मुस्तफिजूर रहमानसाठी उघडली तिजोरी
नवीन नियमामुळे संघांचे होणार नुकसान –
सुरक्षेच्या कारणास्तव, आयपीएल २०२५ च्या उर्वरित सामन्यांमध्ये अनेक परदेशी खेळाडू खेळू शकणार नाहीत. अशा परिस्थितीत, अनेक संघांनी या खेळाडूंसाठी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. हे लक्षात घेऊन बीसीसीआयने आयपीएल २०२५ मध्ये एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. त्यानुसार दिल्लीने जेक फ्रेझर मॅकगर्कच्या जागी मुस्तफिजूर रहमानलाही आपल्या संघात सामील केले आहे. त्याला पुढील हंगामासाठी संघाला रिटेन करता येणार नाही.

