Prithvi Shaw : पृथ्वी शॉच्या इन्स्टा पोस्टने सोशल मीडियावर माजवली खळबळ, काय आहे पोस्ट? जाणून घ्या

Prithvi Shaw Cryptic Instagram Post Viral : आयपीएल २०२५ च्या उर्वरित हंगामाला १७ मे पासून सुरुवात होणार आहे. याआधी भारतीय फलंदाज पृथ्वी शॉच्या एका इंस्टा पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. गेल्या एक वर्षापासून स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर असलेल्या शॉच्या या पोस्टमुळे त्याच्या भविष्याबद्दल अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शॉने शेवटचा सामना देशांतर्गत क्रिकेटमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळला होता.
पृथ्वी शॉने इन्स्टावर शेअर केली अनोखी स्टोरी –
पृथ्वी शॉने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की, “मला ब्रेक हवा आहे.” त्याच्या या पोस्टमुळे चाहत्यांना आणि माजी क्रिकेटपटूंना शॉ पुढे काय पाऊल उचलणार आहे याचा विचार करण्यास भाग पाडले आहे. पृथ्वी शॉ त्याच्या क्रिकेट शैलीत काही बदल करेल का?
Aap break pe ni ho ab bhi??#prithvishaw#Cricket pic.twitter.com/Wp8B1rtSen
— Timepass pundits (@timepasspundits) May 14, 2025
गेल्या रणजी ट्रॉफी हंगामात मुंबई रणजी संघाने शॉला संघातून वगळले होते. त्याच्या तंदुरुस्तीचे कारण देत मुंबईने हा निर्णय घेतला होता. यासोबतच, आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावातही पृथ्वी शॉ अनसोल्ड राहिला. मात्र, याआधी त्याने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेल्या ७९ सामन्यांमध्ये १४७.४६ च्या स्ट्राइक रेटने १८९२ धावा केल्या आहेत. मुंबईसाठी देशांतर्गत संघात एकत्र खेळलेला आणि सध्या पंजाब किंग्जचा एक उत्कृष्ट स्फोटक फलंदाज असलेला शशांक सिंगने शॉबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – IPL 2025 : आर्चर-बटलरसह इंग्लंडचे चार दिग्गज खेळाडू आयपीएलसाठी परतणार नाहीत, काय आहे कारण?
शशांक सिंग पृथ्वी शॉबद्दल काय म्हणाला?
एका पॉडकास्टमध्ये बोलताना शशांक पृथ्वी शॉबद्दल म्हणाला की, ‘लोक शॉला कमी लेखत आहेत. जर पृथ्वीने पुन्हा त्याच्या मूलभूत गोष्टींवर काम करायला सुरुवात केली, तर तो फलंदाज म्हणून काहीही साध्य करू शकतो. त्याला त्याच्या झोपेच्या वेळापत्रकात तसेच आहारातही बदल करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून तो भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करू शकेल आणि क्रिकेटमध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीने योगदान देऊ शकेल.’





