SMAT 2025 : अर्शिन-शॉची हैदराबादविरुद्ध तुफान फटकेबाजी; महाराष्ट्राचा ८ गडी राखून दणदणीत विजय!

महाराष्ट्राचा पहिला विजय –
महाराष्ट्राच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जलज सक्सेनाने दुसऱ्याच षटकांत सलामीवीर तन्मय अग्रवालला बाद करत महाराष्ट्राला चांगली सुरुवात करुव दिली. राजवर्धन हंगरगेकरने दुसरा सलामीवीर अमन रावलाही लवकरच माघारी पाठवले. त्यानंतर हैद्राबादच्या फलंदाजांना मोठ्या भागीदारी रचा आल्या नाहीत. परंतु प्रग्नय रेड्डी (२५ धावा), राहुल बुद्धी (३२ धावा), भावेश सेठ (१९ धावा) टी त्यागराजन (३२ धावा), मिलिंद (३५ धावा) अशी खेळी करत धावफलक हालता ठेवला.
मिलिंद आणि मोहम्मदची ५३ धावांची भागीदारी –
सातव्या गड्यासाठी कर्णधार मिलिंद आणि मोहम्मद अरफाज अहमद यांच्यात मात्र ५३ धावांची भागीदारी झाली. हैद्राबादच्या संघाने निर्धारित २० षटकांत ८ बाद १९१ धावांपर्यंत मजल मारली. हैद्राबादकडून कर्णधार मिलिंदने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली, तर महाराष्ट्राकडून जलज सक्सेनाने २ तर राजवर्धन हंगरगेकर ,विकी ओस्तवाल आणि रामकृष्ण घोष यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात १९२ धावांचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या महाराष्ट्राच्या संघाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार पृथ्वी शॉ आणि अर्शिन कुलकर्णी यांनी सुरुवातीपासूनच जोरदार फटकेबाजी करत हैद्राबादच्या गोलंदाजांना लय सापडू दिली नाही. या सलामी जोडीने पहिल्या गड्यासाठी १२.१ षटकांत ११७ धावांची भागीदारी रचली. अर्धशतक झळकावून पृथ्वी शॉ बाद झाला. शॉने ३६ चेंडुत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६६ धावांची खेळी केली.
हेही वाचा – Ayush Mhatre Century : कर्णधार बनताच आयुष म्हात्रेचा मोठा पराक्रम! रोहित शर्माचा मोडला जागतिक विक्रम
शॉ-कुलकर्णीने झळकावले अर्धशतक –
पृथ्वी शॉ बाद झाल्यावर फलंदाजीला आलेला अझीम काझी ही ८ धावा काढुन झटपट बाद झाला. त्यानंतर मात्र अर्शिन कुलकर्णी आणि राहुल त्रिपाठी यांनी १७ चेंडुत नाबाद ४१ धावांची भागीदारी रचत महाराष्ट्राला १८.४ षटकांत विजय मिळवून दिला. अर्शिन ५४ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८९ धावांवर नाबाद राहिला तर त्रिपाठीने ११ चेंडूत नाबाद २६ धावांची खेळी केली. हैद्राबादकडून चिंतला रेड्डी आणि अजय देव गौड यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.





