Prithvi Shaw Engagement : पृथ्वी शॉ ‘क्लीन बोल्ड’! आकृती अग्रवालसोबत गुपचूप उरकला साखरपुडा; दोघांचे रोमँटिक फोटो व्हायरल
Prithvi Shaw Engagement : आपला जिवलग मित्र अर्जुन तेंडुलकरच्या लग्नानंतर काही दिवसांतच पृथ्वीनेही आपल्या साखरपुडा झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

Prithvi Shaw Engagement with Akriti Agrawal : भारतीय क्रिकेटचा ‘उदयोन्मुख तारा’ मानला गेलेला पृथ्वी शॉ सध्या एका वेगळ्याच आनंदात आहे. आपला जिवलग मित्र अर्जुन तेंडुलकरच्या लग्नानंतर काही दिवसांतच पृथ्वीनेही आपल्या साखरपुडा झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर आकृती अग्रवालसोबतचे साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला.
कोण आहे पृथ्वीची होणारी पत्नी?
पृथ्वीने आकृती अग्रवाल हिच्याशी साखरपुडा केला आहे. आकृती ही एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्युबर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. नुकत्याच झालेल्या अर्जुन तेंडुलकरच्या लग्नातही पृथ्वी आणि आकृती एकत्र दिसले होते. आता या नात्यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले असून, क्रिकेट विश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पृथ्वीच्या कारकिर्दीतील चढ-उतार आणि वादांचे ग्रहण –
Indian cricketer Prithvi Shaw and social media personality Akriti Agarwal are officially engaged💍✨
Love is in the air as #PrithviShaw begins a beautiful new chapter with #AkritiAgarwal. Fans are flooding social media with wishes as the couple celebrates their special moment.❤️ pic.twitter.com/d1r0sOxgZn
— AMIT 🎬 (@AmitManoj5) March 8, 2026
- २०१८ मध्ये वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी भारतीय संघाकडून कसोटी पदार्पणात शतक झळकावत पृथ्वीने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. मात्र, त्यानंतर त्याचे नशीब फिरले.
- २०१९: डोपिंग प्रकरणात दोषी आढळल्याने ८ महिन्यांचे निलंबन.
- २०२३: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिलसोबतचा पबमधील वाद आणि कायदेशीर कटकटी.
- २०२४-२५: फिटनेस आणि शिस्तभंगाच्या आरोपांमुळे मुंबईच्या संघातून गच्छंती आणि आयपीएल २०२५ मध्ये ‘अनसोल्ड’ राहण्याचा धक्का.
पुनरागमनाची जिद्द आणि नवा प्रवास –
View this post on Instagram
खराब फॉर्म आणि वादांच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी पृथ्वीने कठोर पावले उचलली आहेत. त्याने मुंबई संघाची साथ सोडून आता महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र संघासाठी पदार्पणातच शतक झळकावत त्याने आपले कौशल्य अद्याप संपले नसल्याचे सिद्ध केले. आता वैयक्तिक आयुष्यात स्थिरावल्यामुळे पृथ्वी पुन्हा एकदा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावेल, अशी आशा त्याचे चाहते व्यक्त करत आहेत.
डिसेंबर २०२५ मध्ये पार पडलेल्या आयपीएल २०२६ च्या लिलावात पृथ्वी शॉसाठीचा प्रवास बराच नाट्यमय राहिला. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते (तो ‘अनसोल्ड’ राहिला होता). मात्र, लिलावाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात म्हणजेच ‘एक्सीलरेटेड राउंड’मध्ये दिल्ली कॅपिटल्सने त्याच्या ७५ लाख रुपयांच्या बेस प्राईसवर त्याला आपल्या संघात सामील करून घेतले.





