Prithvi Shaw : पृथ्वी शॉचे आयपीएल लिलावात हार्टब्रेक ते होमकमिंग: इन्स्टा स्टोरीने घेतला असा यू-टर्न!

Prithvi Shaw insta story viral during IPL Auction 2026 : आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये मंगळवारी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. महाराष्ट्र संघाचा आक्रमक सलामीवीर पृथ्वी शॉ याच्यासाठी हा लिलाव एखाद्या ‘रोलर कोस्टर राईड’सारखा ठरला. सुरुवातीला दोन फेऱ्यांमध्ये कोणत्याही संघाने रस न दाखवल्यामुळे अनसोल्ड राहिलेल्या शॉला अखेरच्या टप्प्यात त्याच्या जुन्या संघाने म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सने ताफ्यात सामील करून घेतले. मात्र लिलावादरम्यान पृथ्वी शॉच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरील हालचालींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
इन्स्टाग्राम स्टोरीची जोरदार चर्चा –
आयपीएलच्या १९ व्या हंगामाच्या लिलावादरम्यान पृथ्वी शॉच्या सोशल मीडियावरील हालचालींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्या दोन फेऱ्यात नाव पुकारूनही बोली न लागल्याने शॉ कमालीचा निराश झाला होता. त्याने आधी साईबाबांचा फोटो शेअर करत प्रार्थना केली, मात्र तरीही निवड न झाल्याने त्याने ‘हार्ट ब्रेक’चा (तुटलेल्या हृदयाचा) इमोजी ठेवत आपली खंत व्यक्त केली होती.
“It’s ok” to go unsold when destiny brings you back home in the accelerated round. 😅💙#PrithviShaw #DelhiCapitals #IPLAuction #IPL2026 #BackHome #ItsOk #Cricket #CricketReels #IndianCricket #DCFans #ViralReels #RVGJ pic.twitter.com/rS1cvi8BvA
— RVCJ Sports (@RVCJ_Sports) December 17, 2025
परंतु, लिलावाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात जेव्हा दिल्ली कॅपिटल्सने त्याला त्याच्या ७५ लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले, तेव्हा त्याने तातडीने आधीचे स्टेटस डिलीट केले. त्यानंतर त्याने दिल्ली कॅपिटल्सच्या जर्सीतील फोटो शेअर करत “मी माझ्या कुटुंबात परतलो” असे भावनिक स्टेटस ठेवले.





