NED vs NEP : क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच! तिहेरी सुपर ओव्हरनंतर नेदरलँड्सचा ऐतिहासिक विजय

NED vs NEP Three Super Over match : ग्लासगो येथे १६ जून २०२५ रोजी झालेल्या स्कॉटलंड टी-20 ट्राय-सीरिजमधील नेपाळ आणि नेदरलँड्स यांच्यातील सामन्याने क्रिकेट इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला. पुरुषांच्या टी-२० किंवा लिस्ट A सामन्यात प्रथमच तिहेरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली, ज्याने प्रेक्षकांना थरारक अनुभव दिला. नेदरलँड्सने हा सामना अखेरीस जिंकला, पण विजयासाठी त्यांना तीन सुपर ओव्हरचा सामना करावा लागला.
एकाच सामन्यात रंगला तीन सुपर ओव्हरचा थरार –
या सामन्यात नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ७ बाद १५२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात नेपाळला शेवटच्या षटकात विजयासाठी १६ धावांची गरज होती. नंदन यादवने शेवटच्या चेंडूवर चौकार मारत सामना बरोबरीत आणला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये नेपाळच्या कुशल भुर्तेलने १८ धावा कुटल्या, पण मॅक्स ओ’डॉडने शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार आणि चौकार मारत १९ धावांसह सामना पुन्हा बरोबरीत आणला.
Opening Scene followed by Out of Syllabus Climax. 3 Super Overs. Why should only Full Members have the fun!!?? #NEPvsNED pic.twitter.com/P8Ca9UUC85
— Czarsportz Global – Associate Cricket World (@Emerging_96) June 16, 2025
नेदरलँड्सच्या तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये ऐतिहासिक विजय –
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये नेदरलँड्सने १७ धावा केल्या, परंतु दीपेंद्र सिंग ऐरीने शेवटच्या चेंडूवर षटकार मारत पुन्हा बरोबरी साधली. तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये नेदरलँड्सच्या झॅक लायन-कॅशेटने रोहित पौडेल आणि रुपेश सिंग यांना बाद करत नेपाळला धाव नोंदवता येऊ दिली नाही. मायकेल लेव्हिटने संदीप लामिछानेला पहिल्याच चेंडूवर षटकार मारत नेदरलँड्सला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
हेही वाचा – Shardul Thakur : शार्दुल ठाकूरचं धमाकेदार शतक, इंग्लंड दौऱ्यापूर्वी ठोकला कसोटी संघात दावा
संदीप लामिछानेने घेतल्या ३ विकेट्स –
𝗧𝗿𝘂𝗲 𝗖𝗿𝗶𝗰𝗸𝗲𝘁 𝗛𝗶𝘀𝘁𝗼𝗿𝘆 📚🧡
Historic scenes unfolded in Glasgow as our T20I game against Nepal went into a third Super Over. A mindblowing game, but we got there! 💪🏼https://t.co/Bh1dF7soIB#kncbcricket #kncbmen #T20I #TriSeries #nepned pic.twitter.com/tS63H6u3Bg
— Cricket🏏Netherlands (@KNCBcricket) June 16, 2025
नेपाळच्या संदीप लामिछानेने ४ षटकांत १८ धावांत ३ विकेट्स घेत शानदार गोलंदाजी केली, तर रोहित पौडेल (४८) आणि कुशल भुर्तेल (३४) यांनी फलंदाजीत योगदान दिले. हा सामना क्रिकेटप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरला, ज्याने सुपर ओव्हरच्या उत्साहाला नवीन उंचीवर नेले.
हेही वाचा – TNPL 2025 : अश्विनवर बॉल टॅम्परिंगचा गंभीर आरोप, TNPL मध्ये खळबळ!
आयसीसीचा नियम काय सांगतो?
आयसीसी नियमानुसार, दोन्ही डाव पूर्ण झाल्यानंतर जर संघांचे गुण समान असतील तर सुपर ओव्हर खेळवली जाते. जर सुपर ओव्हरही टाय झाली तर विजेता निश्चित होईपर्यंत सुपर ओव्हरची मालिका चालूच राहते.





