IPL 2024 : रोहित शर्माने रचला इतिहास, T20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू…

Rohit Sharma Records : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामातील 20 व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मुंबई इंडियन्ससाठी इशान किशनसोबत डावाची सलामी देण्यासाठी आलेला रोहित शर्मा आज आपल्या जुन्या शैलीत फलंदाजी करताना दिसला. मात्र, तो 27 चेंडूत 49 धावांची खेळी खेळल्यानंतर बाद झाला ज्यामध्ये त्याने 6 चौकार आणि 3 षटकारही( चौकार आणि षटकार दोन्ही मिळून एकूण 9 बाउंड्रीज) लगावले. यासह रोहितने T20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केली जी यापूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूला करता आली नव्हती.
रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात एकूण 9 बाउंड्रीज (6 चौकार आणि 3 षटकार) लगावले. यासह आता त्याच्या नावावर T20 क्रिकेटमध्ये 1508 बाउंड्रीजची नोंद झाली आहे, ज्यानंतर रोहित या फॉरमॅटमध्ये 1500 हून अधिक बाउंड्रीज मारण्याचा विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.रोहितनंतर, विराट कोहली टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बाउंड्रीज मारणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याच्या नावावर एकूण 1486 बाउंड्रीज आहेत. तर यादीत 1337 बाउंड्रीज सह शिखर धवन तिसऱ्या क्रमाकांवर आहे.
जागतिक क्रिकेटमध्ये T20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक बाउंड्रीज (चौकार आणि षटकार) मारण्याचा विक्रम पाहिल्यास ख्रिस गेल पहिल्या स्थानावर आहे, ज्याने आतापर्यंत एकूण 2196 बाउंड्रीज लगावले आहेत.
T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बाउंड्रीज मारणारे खेळाडू
ख्रिस गेल – 2196
ॲलेक्स हेल्स – 1855
डेव्हिड वॉर्नर – 1673
किरॉन पोलार्ड – 1670
आरोन फिंच – 1557
रोहित शर्मा – 1508
IPL 2024 (RR vs RCB Match 19) : विराट कोहलीने एकाच सामन्यात नावावर केले 3 मोठे विक्रम…
रोहित शर्माने मोडला एमएस धोनीचा विक्रम…
रोहित शर्माने दिल्लीविरुद्धच्या खेळीत 3 षटकार मारले आणि आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला. रोहित शर्माने दिल्लीविरुद्ध आतापर्यंत एकूण 49 षटकार मारले आहेत, जे या लीगमधील कोणत्याही एका संघाविरुद्ध भारतीय फलंदाजाने मारलेले सर्वाधिक षटकार आहेत. याआधी धोनीने आरसीबीविरुद्ध एकूण 46 षटकार ठोकले होते, मात्र आता तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.





