IPL 2024 (CSK vs SRH Match 46) : सीएसकेने T20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ…

Chennai Super Kings, IPL 2024 : आयपीएल 2024 चा 46 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी गमावून 212 धावा केल्या होत्या. यासह चेन्नई सुपर किंग्जने टी-20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रमही आपल्या नावावर केला आहे.
CSK ने T20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास…
चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. सीएसके संघाने T20 क्रिकेटमध्ये 35व्यांदा 200+ धावा केल्या आहेत. यासह चेन्नई सुपर किंग्जने T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 200+ धावसंख्या करण्याचा विश्वविक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम समरसेटच्या नावावर होता. समरसेटने 34 वेळा T20 क्रिकेटमध्ये 200+ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर या यादीत टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर आहे.
T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 200+ धावसंख्या करणारे संघ..
35 वेळा – चेन्नई सुपर किंग्ज (IPL)
34 वेळा – समरसेट (County Cricket Club)
32 वेळा – भारतीय संघ (Team India)
31 वेळा – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (IPL)
29 वेळा – यॉर्कशायर (County Cricket Club)
28 वेळा – सरे (Surrey County Cricket Club)
सीएसकेचा मोठा विजय….
दरम्यान, इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामात 29 एप्रिल रोजी दोन सामने खेळले गेले, एका सामन्यात RCB ने गुजरात टायटन्सचा एकतर्फी 9 गडी राखून पराभव केला. दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादवर 78 धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना CSK ने 20 षटकात 212 धावा केल्या, ज्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ 18.5 षटकात 134 धावांवरच मर्यादित राहिला.





