Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप; राष्ट्रवादी NDA मध्ये जाणार? तटकरे-शहा भेटीने राजकीय चर्चांना वेग
Maharashtra Politics : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) थेट राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सामील होणार असल्याच्या चर्चांनी प्रचंड वेग घेतला आहे.

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) प्रवेश होणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांत वेग आला आहे. (Maharashtra Politics)
या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली भेट तसेच सुनील तटकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यातील बैठक यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. (Maharashtra Politics)
सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य NDA प्रवेशाबाबतची माहिती राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही देण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (Maharashtra Politics)
मोदी-पवार भेटीनंतर चर्चांना वेग
गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य NDA प्रवेशाच्या चर्चांना अधिक वेग आला. काही माध्यमांमध्ये भाजपकडून दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलिनीकरणाची अट असल्याच्याही चर्चा समोर आल्या होत्या. मात्र, या दाव्यांवर कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. (Maharashtra Politics)
अमित शाह-तटकरे बैठक चर्चेत
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीत विविध राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली असून, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य NDA प्रवेशाबाबतही चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, बैठकीनंतर यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. (Maharashtra Politics)

सूत्रांच्या दाव्यानुसार, शरद पवार गटातील काही लोकप्रतिनिधी NDA सोबत जाण्यास इच्छुक असल्याचीही चर्चा आहे. तथापि, याबाबत शरद पवार, त्यांच्या पक्षाकडून किंवा भाजपकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगली असून, पुढील काही दिवसांत याबाबत नेमके काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)
Maharashtra Politics : मोठी बातमी..! भास्कर जाधव भाजपात जाणार?; भाजपा आमदाराची थेट ऑफर





