NCP Committee: राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू; पत्र व्हायरल होताच सुनेत्रा पवारांचे स्पष्टीकरण…
NCP Committee: नवीन कार्यकारिणीत अजित पवारांच्या मुलांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली

NCP Committee: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय कार्यकारिणीची नवीन यादी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या या यादीतून गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचा राष्ट्रीय चेहरा राहिलेल्या पटेल यांना कार्यकारिणीतून वगळल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. फक्त पटेलच नाही तर महाराष्ट्रातील पक्षाचे एकमेव लोकसभा खासदार सुनील तटकरे यांचेही नाव सरचिटणीस पदावरून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे.
त्याचसोबत छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे-पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांची नावेही नवीन यादीतून गायब झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या ही यादी सोशल मिडियावर व्हायरल झाली असून, यावरून विविध चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाला राष्ट्रीय कार्यकारिणी आणि त्यांचे काम यासंदर्भात सविस्तर यादी 29 एप्रिलला दिल्याचे पत्र प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे, मात्र प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि वळसे-पाटील यांना स्थान मिळालेले नाही.
या यादीवरून निर्माण झालेला वाद आणि चर्चा पाहता सुनेत्रा पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यांच्या यादीत त्रुटी असून, ती लवकरच दुरुस्त केली जाईल, असं सुनेत्रा पवार यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितले आहे. NCP Committee
A list of office bearers of the NCP circulating in the media has a clerical mistake and will be corrected soon.
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) May 11, 2026
दरम्यान, या पत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या सोबत जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ पवार आणि जय पवार यांचे सुद्धा नाव आहे. मात्र यामध्ये प्रफुल पटेल सुनील तटकरे या नेत्यांची नावे राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये वगळण्यात आल्याचे या यादीमध्ये दिसत आहे. यावरून पक्षाने आपली जुनी फळी पूर्णपणे बाजूला केल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
अजित पवारांच्या मुलांकडे महत्त्वाची जबाबदारी
या नवीन कार्यकारिणीत अजित पवारांच्या मुलांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पार्थ पवार यांची जनरल सेक्रेटरी (सरचिटणीस) पदी, तर जय पवार यांची नॅशनल सेक्रेटरी (राष्ट्रीय सचिव) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या या नव्या यादीत सुबोध मोहिते, सना मलिक, अविनाश आदिक, धीरज शर्मा, अभिषेक बोके, संजय प्रजापती, धनंजय शर्मा, राणा रणवीर सिंग आणि डॉ. रमण प्रीत सिंग यांच्या नावांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या या नव्या यादीतील अनुभवी नेत्यांना मिळालेला डच्चू देण्यात आल्याने राष्ट्रवादीतील अंतर्गत समोर आल्याच्या चर्चा देखील होत आहे. NCP Committee
हेही वाचा:






