National Sports Day : क्रीडा म्हणजे फक्त मैदान नव्हे
आजच्या काळात क्रीडा, आरोग्य, फिटनेस आणि शारीरिक शिक्षण या क्षेत्रांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

National Sports Day : आजच्या काळात क्रीडा, आरोग्य, फिटनेस आणि शारीरिक शिक्षण या क्षेत्रांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रशिक्षित शारीरिक शिक्षण शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, संशोधक, प्रशासक, फिटनेस तज्ज्ञ आणि शारीरिक शिक्षण संचालकांची मागणी सातत्याने वाढत आहे.
त्यामुळे क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे हे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून देणारे महत्त्वाचे केंद्र ठरत आहे.
बारावीनंतर क्रीडा शिक्षणाचा पाया
बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी बी.पी.ई.एस. हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. क्रीडा व शारीरिक शिक्षण क्षेत्रातील मूलभूत ज्ञान आणि कौशल्ये विकसित करणारा हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या करिअरचा भक्कम पाया तयार करतो. बी.पी.ई.एस.नंतर बी.पी.एड. हा व्यावसायिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम करता येतो. बी.पी.एड. पूर्ण केल्यानंतर शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून काम करण्याच्या संधी उपलब्ध होतात.
पदव्युतर शिक्षणातून करिअरला नवी दिशा
यानंतर एम.पी.एड. हा दोन वर्षांचा पदव्युतर अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पुढील करिअरच्या संधी उपलब्ध करून देतो. एम.पी.एड.नंतर वरिष्ठ महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शारीरिक शिक्षण संचालक म्हणून कार्य करता येते. नेट किंवा सेट परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापनाच्या संधी खुल्या होतात. पुढे पीएच.डी. करून संशोधन, अध्यापन, शैक्षणिक नेतृत्व आणि संशोधन मार्गदर्शन क्षेत्रातही करिअर करता येते.
क्रीडाक्षेत्रात करिअरच्या व्यापक संधी
क्रीडाक्षेत्र आता केवळ शिक्षक किंवा प्रशिक्षक होण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. फिटनेस सल्लागार, क्रीडा प्रशासक, स्पोर्ट्स सायंटिस्ट, परफॉर्मन्स अॅनालिस्ट, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग तज्ज्ञ, क्रीडा संशोधक तसेच हेल्थ आणि वेलनेस तज्ज्ञ म्हणूनही विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध आहेत.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव
बी.पी.ई.एस., बी.पी.एड. आणि एम.पी.एड.च्या विद्यार्थ्यांना दक्षिण-पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ, अखिल भारतीय आंतरविद्यापीठ, खेलो इंडिया आंतरविद्यापीठ तसेच जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळते. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना आपली क्रीडा गुणवत्ता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध करता येते. त्याचबरोबर नेतृत्वगुण, आत्मविश्वास, संघभावना आणि व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना मिळते.
पीएच.डी.मधून संशोधनाची संधी
एम.पी.एड.नंतर नेट-सेट आणि त्यानंतर पीएच.डी. हा शैक्षणिक प्रवास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण करण्याची संधी देतो. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयात क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विषयात पीएच.डी. करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
संशोधन, अध्यापन, विद्यापीठीय प्रशासन आणि संशोधन मार्गदर्शक म्हणून करिअर घडविण्यासाठी पीएच.डी. महत्त्वाचा टप्पा ठरतो. बारावीनंतर बी.पी.ई.एस., त्यानंतर बी.पी.एड., एम.पी.एड., नेट-सेट आणि पीएच.डी. असा शैक्षणिक प्रवास विद्यार्थ्यांना क्रीडा आणि शारीरिक शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर करिअर घडविण्याची सुवर्णसंधी देतो.






