Nat Sciver Brunt Century : १०५७ दिवसांची प्रतीक्षा संपली! नॅट सायव्हर-ब्रंटने ठोकलं WPL इतिहासातील ‘पहिलं’ शतक
Nat Sciver Brunt Century : नॅट सायव्हर-ब्रंटने डब्ल्यूपीएलमधील पहिलेवहिले शतक झळकावत नवा इतिहास रचला आहे.

Nat Sciver Brunt Century first ever in WPL History : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या इतिहासात २६ जानेवारी २०२६ हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. इंग्लंडची स्टार ऑलराउंडर नॅट सायव्हर-ब्रंटने डब्ल्यूपीएलमधील पहिलेवहिले शतक झळकावत नवा इतिहास रचला आहे. मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यात वडोदरा येथील कोटांबी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात तिने हा पराक्रम केला.
५७ चेंडूत गाठला ऐतिहासिक टप्पा –
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सची धुरा नॅट सायव्हर-ब्रंटने आपल्या खांद्यावर घेतली. तिने सुरुवातीला सावध खेळी करत ३२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर आक्रमक पवित्रा घेत अवघ्या ५७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. डब्ल्यूपीएल सुरू झाल्यापासून १०५७ दिवस आणि ८२ सामन्यांनंतर अखेर क्रिकेट चाहत्यांना पहिले शतक पाहायला मिळाले.
मुंबईने उभारला धावांचा डोंगर –
नॅट सायव्हर-ब्रंटने सलामीवीर हेली मॅथ्यूजसोबत ७३ चेंडूत १३१ धावांची वादळी भागीदारी केली. या शतकीय खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने २० षटकांत ४ बाद १९९ धावांचा विशाल डोंगर उभा केला. आरसीबीच्या गोलंदाजांना नॅट सायव्हर-ब्रंटचे वादळ रोखण्यात पूर्णपणे अपयश आले.
🚨 𝐌𝐀𝐈𝐃𝐄𝐍 𝐓𝐀𝐓𝐀 𝐖𝐏𝐋 𝐇𝐔𝐍𝐃𝐑𝐄𝐃 🚨
Natalie Sciver-Brunt creates history 🫡
Take. A. Bow 🙇♀️
Updates ▶️ https://t.co/yUHXkzVIZw #TATAWPL | #KhelEmotionKa | #RCBvMI | @mipaltan pic.twitter.com/V36ZPlBqL9
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 26, 2026
जॉर्जिया वोल आणि सोफी डिव्हाईनला मागे टाकले –
नॅट सायव्हर ब्रंटने डब्ल्यूपीएलमध्ये शतक झळकावत रचला इतिहास
यापूर्वी डब्ल्यूपीएलमध्ये शतक झळकावण्याच्या जवळ अनेक फलंदाज पोहोचल्या होत्या, मात्र त्यांना यश मिळाले नव्हते. जॉर्जिया वोल आणि सोफी डिव्हाईन दोघीही ९९ धावांवर बाद झाल्या होत्या. तसेच स्मृती मानधनाने याच हंगामात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ९६ धावांवर खेळी साकारली होती.
नॅट सायव्हर-ब्रंट: डब्ल्यूपीएलची ‘रन मशीन’ –
या शतकासह नॅट सायव्हर-ब्रंट डब्ल्यूपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. तिने ३५ डावांमध्ये ५० पेक्षा जास्त सरासरीने आणि १४५ च्या स्ट्राईक रेटने १३४६ धावा केल्या आहेत.





