Don Bradman Baggy Cap : डॉन ब्रॅडमन यांच्या ‘बॅगी ग्रीन’ कॅपचा विक्रम! लिलावात तब्बल ‘इतक्या’ कोटींची लागली बोली
Don Bradman Baggy Cap : सर डॉन ब्रॅडमन यांची ऐतिहासिक 'बॅगी ग्रीन' कॅप सोमवारी एका लिलावात तब्बल ४,६०,००० ऑस्ट्रेलियन डॉलर्सना विकली गेली.

Don Bradman Baggy Green Cap Auction Price : क्रिकेट विश्वातील महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांची ऐतिहासिक ‘बॅगी ग्रीन’ कॅप सोमवारी एका लिलावात तब्बल ४,६०,००० ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे २.९२ कोटी रुपये) विकली गेली आहे. गोल्ड कोस्ट येथे झालेल्या या लिलावात एका अज्ञात खरेदीदाराने ही बोली लावली असून, ही कॅप आता एका संग्रहालयात (म्युझियम) चाहत्यांच्या दर्शनासाठी ठेवली जाणार आहे.
भारतीय क्रिकेटपटूला दिले होती गिफ्ट –
या कॅपला ऐतिहासिक महत्त्व असण्याचे कारण म्हणजे, ही कॅप ब्रॅडमन यांनी १९४७-४८ मध्ये भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान परिधान केली होती. ही मालिका संपल्यानंतर ब्रॅडमन यांनी ही कॅप भारतीय क्रिकेटपटू श्रीरंगा वासुदेव सोहोनी यांना भेट म्हणून दिली होती. या भावनिक आणि ऐतिहासिक संदर्भामुळे या कॅपचे मूल्य कोटींच्या घरात गेले आहे.
सोहोनी कुटुंबाने ७० वर्षे जपला ठेवा –
डॉन ब्रॅडमन बॅगी ग्रीन कॅप लिलाव
सोहोनी कुटुंबाने ही कॅप गेल्या ७० वर्षांपासून अत्यंत काळजीपूर्वक जतन केली होती. तीन पिढ्यांपासून सुरक्षित असलेल्या या कॅपवर हाताने ‘DG Bradman’ आणि ‘SW Sohoni’ अशी नावे लिहिलेली आहेत, जी तिची सत्यता सिद्ध करतात. विशेष म्हणजे, ही कॅप आजही उत्तम स्थितीत आहे. यापूर्वी २०२४ मध्ये ब्रॅडमन यांची दुसरी एक कॅप ३,११,००० ऑस्ट्रेलियन डॉलर्सना विकली गेली होती, मात्र ती खराब स्थितीत असल्याने या कॅपला त्यापेक्षाही जास्त किंमत मिळाली आहे.
A rare Donald Bradman baggy green cap with a remarkable backstory is set to go under the auctioneer’s hammer.
The Don gifted it to a young Indian opponent, the prized possession kept in his family for more than 70 years. @amberjohnston_9 #9News pic.twitter.com/SpmkFleOtM
— 9News Melbourne (@9NewsMelb) January 15, 2026
सर डॉन ब्रॅडमन यांचा अद्भूत प्रवास –
- करिअरची सरासरी: सर डॉन ब्रॅडमन यांनी ५२ कसोटी सामन्यांमध्ये ९९.९४ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
- शतके: त्यांनी २९ शतके झळकावली, ज्यात ॲशेस मालिकेतील १९ शतकांचा समावेश आहे.
- दुहेरी शतके: कसोटी कारकिर्दीत त्यांनी १२ वेळा द्विशतकी टप्पा पार केला.
१९४८ मध्ये आपल्या शेवटच्या कसोटी डावात ब्रॅडमन यांना १०० ची सरासरी गाठण्यासाठी फक्त ४ धावांची गरज होती, मात्र ते शून्यावर बाद झाले आणि त्यांचे करिअर ९९.९४ च्या सरासरीवर संपले. २००१ मध्ये वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले, मात्र त्यांच्याशी संबंधित प्रत्येक वस्तू आजही क्रिकेट प्रेमींसाठी अमूल्य आहे.





