Kristen Beams : मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय; ऑस्ट्रेलियाच्या माजी फिरकीपटूवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Mumbai Indians appointed Kristen Beams as coach : महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ च्या चौथ्या हंगामाला ९ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी माजी चॅम्पियन मुंबई इंडियन्स (MI) फ्रँचायझीने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियाची माजी लेग स्पिनर क्रिस्टन बीम्स हिची ‘स्पिन गोलंदाजी प्रशिक्षक’ (Spin Bowling Coach) म्हणून नियुक्ती केली आहे.
सोशल मीडियावर दिली माहिती
मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक विशेष व्हिडीओ शेअर करून क्रिस्टन बीम्सच्या निवडीची घोषणा केली. या व्हिडिओमध्ये बोलताना क्रिस्टन म्हणाली, “मी इथे पहिल्यांदाच प्रशिक्षक म्हणून आले आहे. झूलन गोस्वामींसारख्या महान खेळाडूंसोबत काम करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. ज्यांच्याविरुद्ध मी क्रिकेट खेळले, त्यांच्यासोबत आता एकाच संघात काम करणे आनंदाची बाब आहे.”
Spin आणि win ची recipe घेऊन #AaliRe 💙
Paltan, let’s welcome our new spin bowling coach, Kristen Beams 🙌#MumbaiIndians #TATAWPL pic.twitter.com/5xUrJgkaC5
— Mumbai Indians (@mipaltan) December 29, 2025
यावेळी तिने मुंबई इंडियन्सच्या संस्कृतीचेही कौतुक केले. ती म्हणाली, “हा संघ एका कुटुंबासारखा आहे आणि सर्व खेळाडू एकमेकांशी जोडलेले आहेत. अशा मजबूत वातावरणात आणि जिंकण्याची जिद्द असलेल्या संघाचा भाग होणे हे कोणत्याही प्रशिक्षकासाठी अभिमानाचे असते.”
हेही वाचा – Shubman Gill : ‘विराटची ऊर्जा वेगळ्या उंचीची, गिलला ते कधीच जमणार नाही!’, इग्लंडच्या माजी खेळाडूची टीका
क्रिस्टन बीम्सची कारकीर्द –
४१ वर्षीय क्रिस्टन बीम्सने ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.
- विश्वचषक कामगिरी: २०१७ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात ती सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होती.
- आंतरराष्ट्रीय सामने: तिने ऑस्ट्रेलियासाठी १ कसोटी, ३० एकदिवसीय आणि १८ टी-२० सामने खेळले आहेत.
- विकेट्स: एकदिवसीय सामन्यात ४२ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात तिने २० विकेट्स घेतल्या आहेत.
- लीग अनुभव: तिने महिला बिग बॅश लीगमध्येही ४५ सामने खेळले आहेत.
हेही वाचा – Shubman Gill : ‘विराटची ऊर्जा वेगळ्या उंचीची, गिलला ते कधीच जमणार नाही!’, इग्लंडच्या माजी खेळाडूची टीका
डब्ल्यूपीएल २०२६ कधी सुरु होणार?
डब्ल्यूपीएलचा चौथा हंगाम ९ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार असून, या स्पर्धेचा अंतिम सामना ५ फेब्रुवारी रोजी खेळवला जाईल. क्रिस्टन बीम्सच्या अनुभवाचा मुंबई इंडियन्सच्या फिरकीपटूंना किती फायदा होतो, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.





