WPL 2025 MI vs GG Eliminator : मुंबईच्या मॅथ्यूज-ब्रंट जोडीने गुजरातविरुद्ध उभारला धावांचा डोंगर! तब्बल ‘इतक्या’ धावांचे दिले लक्ष्य

WPL 2025 MI vs GG Eliminator Updates : हेली मॅथ्यूज आणि नॅट सिव्हर ब्रंट यांच्या शतकी भागीदारीमुळे, मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्ससमोर २१४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या हंगामातील विजेत्या संघाने २० षटकांत चार गडी गमावून २१३ धावा केल्या. महिला प्रीमियर लीगच्या इतिहासातील पहिल्या डावातील ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. गुजरातकडून डॅनियल गिब्सनने दोन आणि काशवी गौतमने एक विकेट घेतली.
हेली आणि ब्रंट यांनी साकारली १३३ धावांची भागीदारी –
मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या एलिमिनेटर सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यास्तिका भाटिया फक्त १५ धावा करून बाद झाली, पण त्यानंतर हेली मॅथ्यूज आणि नॅट सायव्हर ब्रंट यांनी मोठा धमाका केला. या दोघींनी पहिल्यांदाच एलिमिनेटर सामना खेळणाऱ्या गुजरातच्या गोलंदाजांना घाम फोडला. हेली आणि ब्रंट दोघींमध्ये १३३ धावांची भागीदारी झाली. मुंबईला पहिला धक्का पाचव्या षटकात २६ धावांवर बसला.
हेली-ब्रंट यांनी गुजरातच्या गोलंदाजांना फोडला घाम –
Innings Break!
Mumbai Indians score the highest team total in #TATAWPL Playoffs💪#GG have a huge challenge ahead of them 👀
Who moves ahead to the Final? ⌛
Updates ▶ https://t.co/v62GxzKUW2 #MIvGG | #Eliminator | @mipaltan pic.twitter.com/N8UOHUv2Ak
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 13, 2025
यानंतर, मॅथ्यूजला इंग्लंडची अष्टपैलू खेळाडू ब्रंटची साथ मिळाली आणि दोघींनीही धावसंख्या १५० च्या पुढे नेली. हेलीने ५० चेंडूत ७७ धावा केल्या तर ब्रंटने ४१ चेंडूत ७७ धावा केल्या. तसेच कर्णधार हरमनप्रीत कौरने १२ चेंडूत ३०० च्या स्ट्राईक रेटने ३६ धावा केल्या. दरम्यान, सजीवन सजना एक धाव काढल्यानंतर नाबाद राहिली.
मुंबई इंडियन्सने उभारली डब्ल्यूपीएल इतिहासातील आपली सर्वोच्च धावसंख्या –
मुंबई इंडियन्सने आता डब्ल्यूपीएल इतिहासातील त्यांची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. यापूर्वी, महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबईचा सर्वोच्च धावसंख्या २०७ धावा होती, जी त्यांनी २०२३ मध्ये गुजरातविरुद्ध केली होती. आता एमआयने २१३ धावा करून आपला विक्रम सुधारला आहे, हा विक्रम गुजरातविरुद्धही तयार झाला आहे. डब्ल्यूपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या यूपी वॉरियर्सच्या नावावर आहे, ज्यांनी डब्ल्यूपीएल २०२५ मध्ये आरसीबीविरुद्ध खेळताना २२५ धावा केल्या होत्या.





