Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव
Eknath Shinde : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीतून महायुतीसाठी अत्यंत धक्कादायक बातमी आली आहे.

Eknath Shinde : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव केला आहे. (Eknath Shinde)
पहिल्याच फेरीत आवश्यक मते मिळवत गीतेंनी नाशिकच्या गडात ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता मंत्री दादा भुसे यांनी अवघ्या दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली. आम्ही सगळ्याची शहानिशा करू. (Eknath Shinde)
आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर भाष्य करतील, असे म्हणत भुसे यांनी यावर बोलणे टाळले. विजयी झाल्यानंतर गीते कमालीचे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी निफाड तालुक्यातील शिंगवे या आपल्या मूळ गावी कुटुंबीयांकडून औक्षण करून घेतल्यानंतर दराडे कुटुंबावर जोरदार टीका केली. (Eknath Shinde)
प्रचारादरम्यान दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे यांनी फोनवरून गोकुळ गीते यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप गोकुळ गीते यांनी केला होता. कुणाल दराडे यांनी आमचा बाप काढल्यामुळे नाराज आहोत, अशा प्रकारे धमकी दिल्याने मी आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, असे गोकुळ गीते म्हणाले होते. (Eknath Shinde)
आता विजयानंतर गोकुळ गीते यांनी निवडणुकीत माझा बाप काढण्यात आला होता, माझे वडील सात-आठ वर्षांपासून पॅरेलाईज आहेत. त्यामुळे मी माझा बाप दाखवून दिला, असे म्हणत त्यांनी निशाणा साधला. (Eknath Shinde)






