Eknath Shinde : एकनाथ शिंदें थेट मुख्यमंत्री होणार? ‘त्या’ ट्विटने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अत्यंत नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. आधी शिवसेनेत उभी फूट पाडून महाविकास आघाडी सरकार उलथवून लावणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे.

Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अत्यंत नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. आधी शिवसेनेत उभी फूट पाडून महाविकास आघाडी सरकार उलथवून लावणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे.
आधी अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर उपमुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, या सत्ता बदलाच्या चक्रानंतरही राजकीय घडामोडींचा वेग मंदावलेला नाही.
ठाकरे गटाला लागलेली गळती, शिंदे गटात होऊ घातलेला मोठा पक्षप्रवेश आणि ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांच्या एका ट्विटमुळे सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का; ६ खासदार शिंदे गटात जाणार?
मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातील तब्बल ६ खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याची तयारी दर्शवली आहे. हे सर्व खासदार लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील ‘शिवसेना’ (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. जर या खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला, तर केंद्रातील (दिल्लीत) शिंदे गटाची ताकद कमालीची वाढणार आहे.
“शिंदे गट भाजपमध्ये विलीन करा आणि मुख्यमंत्री व्हा!”
एकीकडे खासदारांच्या पक्षांतराची चर्चा सुरू असतानाच, ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांच्या एका ट्विटने राजकीय वर्तुळात बॉम्बगोळा टाकला आहे. असीम सरोदे यांनी थेट भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात पडद्यामागे सुरू असलेल्या एका मोठ्या डीलचा दावा केला आहे.
असीम सरोदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की:”भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे, अशी माहिती अतिशय खात्रीशीर सूत्रांकडूनच नाही तर काही मोठ्या व प्रतिष्ठित लोकांकडून मिळते आहे. खरी गंमत म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात भाजपने शिंदेंसमोर एक अट ठेवली आहे की, शिंदे गट भाजपमध्ये विलीन करायचा.”
भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे, अशी माहिती अतिशय खात्रीशीर सूत्रांकडूनच नाही तर काही मोठ्या व प्रतिष्ठित लोकांकडून मिळते आहे. खरी गमंत म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात भाजपने शिंदे समोर एक अट ठेवली आहे की शिंदे गट भाजपमध्ये विलीन करायचा.
राजकारण मजेशीर…— Asim Sarode (@AsimSarode) June 20, 2026
सरोदे यांनी पुढे लिहिले आहे की, “राजकारण मजेशीर वळणावर आलेले दिसत असले तरी देवेंद्र फडणवीस फॅक्टर निस्तेज करण्याची तयारी हा त्यातील गंभीर भाग आहे. फडणवीस नेहमी शिंदेंना पाण्यात बघतात व मराठा नेतृत्वाचा आपल्याला धोका आहे असे त्यांना वाटते. बघूया काय काय घडतंय ?” सरोदे यांच्या या दाव्यामुळे भाजप आणि शिंदे गटात अंतर्गत पातळीवर नेमकं काय शिजतंय, याबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.





