Narendra Modi : आजचा दिवस राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची नांदी; अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना
संपूर्ण देशभरातील भाजप कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर (Narendra Modi) आनंद पाहायला मिळत आहे. आजचा हा दिवस अनेक दृष्टींनी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजचा दिवस देशाच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरणार आहे.

Narendra Modi : संपूर्ण देशभरातील भाजप कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर (Narendra Modi) आनंद पाहायला मिळत आहे. आजचा हा दिवस अनेक दृष्टींनी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजचा दिवस देशाच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरणार आहे. हा दिवस विश्वास आणि आत्मविश्वासाचा दिवस आहे.
तुम्ही इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला आहे. तुम्ही कमळ फुलवले आहे आणि असे करून खरोखरच काहीतरी असाधारण साध्य केले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले.
देशातील पाच राज्यांचे निकालांचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. आसाम आणि पुदुचेरीमध्ये भाजपला आपली सत्ता कायम ठेवण्यात मोठे यश मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
नरेंद्र मोदी म्हणाले, जेव्हा अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांचे रूपांतर यशात होते, तेव्हा चेहऱ्यावर जो आनंद झळकतो तोच आनंद आज मला मी पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुचेरीच्या जनतेला तसेच तामिळनाडू आणि केरळच्या जनतेला अभिवादन करतो. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने अगदी सामान्य कार्यकर्त्यांपासून ते अत्यंत महत्त्वाच्या पदावरील नेत्यापर्यंत प्रत्येकाने काहीतरी उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि कमळ फुलवले आहे.
तुम्ही खरोखरच इतिहास घडवला आहे. नितीन नवीन यांनी भाजपचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पार पडलेल्या या पहिल्याच विधानसभा निवडणुका होत्या. या काळात पक्ष कार्यकर्त्यांना मिळालेले मार्गदर्शन हा विजय मिळवून देण्यात अत्यंत मोलाचे ठरले आहे. विजय आणि पराभव हे लोकशाही व निवडणूक राजकारणाचे अविभाज्य भाग आहेत.
परंतु पाच राज्यांमधील जनतेने संपूर्ण जगाला हे दाखवून दिले आहे की, आपला भारत खऱ्या अर्थाने लोकशाहीची जननी का आहे. आमच्यासाठी लोकशाही ही केवळ एक व्यवस्था नाही, तर ते एक असे मूल्य आहे जे आमच्या नसानसांत भिनलेले आहे. आज केवळ भारताच्या लोकशाहीचाच विजय झालेला नाही, तर आज भारताच्या संविधानाचाही विजय झाला आहे.
आपल्या संविधानिक संस्था विजयी झाल्या आहेत. आपल्या लोकशाही प्रक्रियांचा विजय झाला आहे. बंगालमध्ये झालेला जवळपास 93 टक्के मतदानाचा आकडा ही स्वतःच एक ऐतिहासिक कामगिरी आहे. भारताच्या लोकशाहीची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी प्रत्येकाने दिलेल्या योगदानाची इतिहासात सदैव नोंद घेतली जाईल, असेही मोदी (Narendra Modi) म्हणाले.
दरम्यान, पोटनिवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मिळविलेल्या विक्रमी मताधिक्क्याचा उल्लेख करत त्यांनी सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या.






