Navneet Rana : “पंतप्रधान नरेंद्र मोदींची आम्ही माफी मागतो”; नवनीत राणांना अश्रु अनावर, विरोधकांना सुनावले खडेबोल
Navneet Rana : 'विरोधी पक्षांनी केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी देशातील महिलांचा हक्क हिरावून घेतला'

Navneet Rana : संसदेच्या विशेष अधिवेशनात मांडण्यात आलेले ‘महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना (परिसीमन) १३१ वे घटनादुरुस्ती विधेयक’ शुक्रवारी लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. मतदानाअंती आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्याने हे विधेयक फेटाळले गेले आहे.
शुक्रवारी संध्याकाळी या विधेयकावर झालेल्या मतदानानंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी निकाल जाहीर केला. विधेयक मंजूर होण्यासाठी सभागृहाच्या दोन-तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा आवश्यक होता, जो मिळू शकला नाही. पहिल्या फेरीत ४८९ मते पडली होती, ज्यात २७८ मते बाजूने तर २११ मते विरोधात होती. अखेरच्या फेरीतही सरकारला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. Navneet Rana
या विधेयकाच्या बाजूने २९८, तर विरोधात २३० मते पडली. लोकसभेत एकूण ५२८ संसद सदस्यांनी मतदान केले. हे विधेयक मंजूर होण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती. ५२८ च्या दोन-तृतीयांश म्हणजे ३५२ मते होतात. अशा प्रकारे, आवश्यक बहुमत मिळवण्यात अपयश आल्यामुळे, हे विधेयक ५४ मतांच्या फरकाने नामंजूर झाले.
दुसरीकडे याच मुद्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्या नवनीत राणा या अतिशय भावूक झाल्या आहेत. लोकसभेमध्ये महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्याने नवनीत राणांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. त्यांनी विरोधी पक्षांवर हल्लाबोल करत, विरोधी पक्षांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी या देशातील महिलांचा अधिकार हिरावून घेतला असल्याचे म्हंटले आहे. Navneet Rana
— Navnit Ravi Rana (@navneetravirana) April 17, 2026
काय म्हणाल्या नवनीत राणा? (Navneet Rana)
अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी रडत रडत महिला आरक्षणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “ज्या लोकांनी या विधेयकाला विरोध केला आहे, त्यांना देशातील महिला कधीही माफ करणार नाहीत. विरोधकांनी महिलांसाठी आजचा हा सर्वात काळा दिवस बनवला आहे, देशातील कोणतीही महिला यांना माफी देणार नाही.”
“मोदीजी, संपूर्ण देशातील महिला तुमचे खूप आभार मानत आहेत. एक पंतप्रधान म्हणून तुम्ही या सामान्य महिलांसाठी, या देशातील महिलांसाठी विधेयक संसदेपर्यंत आणले, चर्चेपर्यंत आणले. मात्र, विरोधी पक्षांनी केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी देशातील महिलांचा हक्क हिरावून घेतला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी महिलांना न्याय देण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला, त्यामुळे त्यांना दंडवत. मात्र आम्ही त्यांची माफी मागतो, त्यांना आम्ही पूर्ण बहुमत देऊ शकलो नाही,” अशी प्रतिक्रिया माजी खासदार नवनीत राणा यांनी दिली.
हेही वाचा:





