जामखेड – तालुक्यातील जवळा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे श्रेणीवर्धन करून प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात यावे, या मागणीचे निवेदन खा. सुजय विखे पाटील यांना जवळा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले.
जामखेड तालुक्यातील जवळा हे मोठे गाव आहे. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून ते पूर्णपणे पडलेले आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात या ठिकाणी आरोग्याच्या सोयी अपुऱ्या पडत आहेत.
गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे श्रेणीवर्धन करून प्रशस्त असे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात यावे, हा प्रश्न मार्गी लावावा, अशा मागणीचे निवेदन जवळा ग्रामस्थांच्या वतीने खा.सुजय विखे पाटील यांना देण्यात आले. याप्रश्नी लक्ष घालून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामार्फत हा प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन खा. सुजय विखे पाटील यांनी दिले.
यावेळी ज्योती क्रांती मल्टीस्टेट सोसायटीचे चेअरमन अजिनाथ हजारे गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील, ग्रा. पं.सदस्य अशोक पठाडे, किसन सरोदे , डॉ.दीपक वाळुंजकर, पत्रकार संतराम सुळ , वन अधिकारी प्रदीप शिंदे, शेतकरी राजेंद्र महाजन हे उपस्थित होते.