विकी कौशलने खरेदी केली लग्जरी कार; पाहा नव्या गाड्याची झलक

Vicky Kaushal | बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ नुकतेच आई-बाबा झाले. यानंतर आता विकीने आपल्या कार कलेक्शनमध्ये नवीन आलिशान गाडीचा समावेश केला आहे. विकीने नुकतीच लेक्सस LM350h 4S ही लग्जरी कार खरेदी केली आहे.मुंबईतील एका कार्यक्रमात विकी सहभागी झाला होता. तिथे तो आपल्या ब्रँड न्यू गाडीसोबत स्पॉट झाला.
लेक्सस LM350h 4S ही ४-सीटर कार आहे, ज्याची किंमत ३.२० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. ही कार हायब्रिड इंजिनवर चालते. यामध्ये ब्रेक असिस्ट, रडार कॅमेरा यांसारखी ड्राइव्ह असिस्ट फीचर्स देखील आहेत, ज्यामुळे गाडी चालवणे सोपे आणि सुरक्षित होते. गाडीमध्ये क्लायमेट कंट्रोल, पॉवर डोअर, चार्जिंग, उत्तम इंटीरियर आणि वुडन-लेदरचा फिनिश आहे. Vicky Kaushal |
View this post on Instagram
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी मुलगा झाल्याची गोड बातमी जाहीर केली. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाले तर, विकी कौशलचा ‘छावा’ बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. आता विकी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’मध्ये दिसणार आहे. यात रणवीर कपूर आणि आलिया भट देखील मुख्य भूमिकेत असतील.
हेही वाचा:
“मला माझी मुलं फक्त हुशार नकोत तर….”; करीना सोशल मीडियावर मुलांविषयी झाली व्यक्त





