Murugappa Gold Cup Hockey 2024 : रेल्वे संघानं पटकावलं विजेतेपद…

MCC Murugappa Gold Cup Hockey 2024 :- गतविजेत्या भारतीय रेल्वे संघाने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन संघाला ५-३ असे पराभूत करताना मुरुगप्पा गोल्ड कप हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. रेल्वे संघाकडून गुरुसाहिबजीत सिंगने ७ व्या मिनिटाला गोल करून खाते उघडले. त्यानंतर सिमरनज्योत सिंगने ९ व्या मिनिटाला गोल करून आघाडी २-० अशी वाढविली.
यानंतर युवराज वाल्मिकीने १८ व्या मिनिटाला गोल करताना आघाडी पुन्हा वाढविली. यानंतर मात्र इंडियन ऑइल संघाकडून २३ व्या मिनिटाला तालविंदर सिंगने तर २९ व्या मिनिटाला गुजींदर सिंगने सलग दोन गोल करून आघाडी ३-२ अशी कमी केली.
IND vs BAN 2nd Test : कोहलीनं मोडला तेंडुलकरचा आणखी एक मोठा विक्रम, 35 धावा करताच रचला इतिहास….
रेल्वेच्या मुकुल शर्माने ३५ व्या मिनिटाला गोल करून रेल्वेला ४-२ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर इंडियन ऑइलच्या राजबीर सिंगने व रेल्वेच्या युवराज वाल्मिकी यांनी ५८ व्या मिनिटाला प्रत्येकी १ गोल केला. त्यावेळी रेल्वे संघ ५-३ असा आघाडीवर राहिला.





