IND vs BAN 2nd Test : कोहलीनं मोडला तेंडुलकरचा आणखी एक मोठा विक्रम, 35 धावा करताच रचला इतिहास….

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने महान सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडला आहे. कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात 47 धावांची खेळी केल्यानंतर बाद होण्यापूर्वी त्याने हा विक्रम केला. वास्तविक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 27 हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा पहिला तर 27 हजार धावांचा टप्पा गाठणारा जगातील चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या कानपूर कसोटी सामन्यात त्याने ही कामगिरी केली.
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कोहलीने 35 धावा करताच हा टप्पा गाठला आहे. हा टप्पा गाठण्यासाठी कोहलीला 594 डाव लागले, तर सचिनने 2007 मध्ये 623 डावांमध्ये हा टप्पा गाठला होता. श्रीलंकेच्या संगकाराने 2015 मध्ये त्याच्या 648 व्या डावात हा टप्पा गाठला होता, तर पाँटिंगने ऑस्ट्रेलियासाठी त्याच्या 650 व्या डावात हा टप्पा गाठला होता.
Another day at office, another milestone breached!@imVkohli now has 27000 runs in international cricket 👏👏
He is the fourth player and second Indian to achieve this feat!#INDvBAN @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ijXWfi5v7O
— BCCI (@BCCI) September 30, 2024
आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 27 हजार धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. 2007 साली सचिनने कारकिर्दीतील 623 व्या इनिंगमध्ये 27 हजार धावांचा आकडा पार केला होता. मात्र कोहलीने त्याच्यापेक्षा 29 डाव कमी खेळून ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दरम्यान, सामना सुरू होण्यापूर्वी कोहलीने 114 सामन्यांमध्ये 48.74 च्या सरासरीने 8871 कसोटी धावा, 295 एकदिवसीय सामन्यांमध्ये 58.18 च्या सरासरीने 13906 धावा तर 125 टी-20 सामन्यांमध्ये 48.69 च्या सरासरीने 4188 धावा केल्या आहेत.
सर्वात जलद 27 हजार धावा…
विराट कोहली (IND)- 594 डाव
सचिन तेंडुलकर (IND) – 623 डाव
कुमार संगकारा (SL)- 648 डाव
रिकी पाँटिंग (AUS) – 650 डाव





