Murlidhar Mohol: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्याला दुचाकीस्वाराचा ओव्हरटेक; गुन्हा दाखल
Murlidhar Mohol: शिवाजीनगर चौकातील प्रकार; भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा आरोप

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाहनांच्या ताफ्याला दुचाकीवरून ओव्हरटेक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी नाना पेठ येथील शुभम विजय वनित (वय ३२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (१३ सप्टेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास शिवाजीनगर येथील संचैती चौकात ही घटना घडली. त्यावेळी पोलीस कर्मचारी ईश्वर लक्ष्मण भिकुले हे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सुरक्षेसाठी कर्तव्यावर होते. मोहोळ यांचा वाहनांचा ताफा चौकातून जात असताना शुभम वनित याने दुचाकी भरधाव व निष्काळजीपणे चालवत ताफ्याला ओव्हरटेक केल्याचा आरोप आहे.
दुचाकी चालविण्याच्या पद्धतीमुळे रस्त्यावरील इतर वाहनचालक तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा:





