पाथर्डी, दि. 18 (प्रतिनिधी)– शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रामगीरबाबा पाण्याची टाकी येथे नगरपरिषद पाणीपुरवठ्याचे पहारेकरी असणारे कर्मचारी अर्जुन पुंजा गायकवाड यांना दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी राजू बाजीराव दिनकर (रा. रामगीर बाबा पाणी टाकीजवळ) याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्जुन गायकवाड हे शुक्रवारी सकाळी दहा वाजता रामगीबाबा पाण्याची टाकी येथे पहारेकरी म्हणून ड्युटीस असताना राजु दिनकर हा पाण्याची टाकी जवळ आला व पाणी सोडण्याच्या कारणावरुन गायकवाड यांना म्हणाला की, उद्यापासुन तु डयुटीवर येवु नको, असे धमकावत दमदाटी करू त्याने गायकवाड यास शिवीगाळ करून गचांडी धरली व मारहाण केली. तु जर उद्यापासुन येथे दिसला तर मी तुला जिवंत सोडणार नाही. तुझ्यावर खोट्या केसेस करू अशी धमकी दिनकर यांनी दिला. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून राजु दिनकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.