IPL 2024 (MI vs LSG Match 67) : मुंबईचा लखनौविरुद्ध गोलंदाजीचा निर्णय; दोन्ही संघाच्या Playing 11 मध्ये मोठे बदल, अर्जुन तेंडुलकरला मिळाली संधी….

IPL 2024 (MI vs LSG Match 67 Toss & Playing XI Update) : आयपीएल 2024 च्या 67 व्या सामन्यात, मुंबई इंडियन्स (MI) चा सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे मैदानावर लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. मुंबई हा प्ले-ऑफ शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ आहे. तर दुसरीकडे लखनौसाठी अजूनही एक छोटीशी आशा शिल्लक आहे, ज्यामध्ये त्यांना शेवटच्या सामन्यातील विजयावर तसेच इतर संघाच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्स संघाच्या बाजूनं लागला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ( Mumbai Indians Won the Toss & elected to Field ) अशा परिस्थितीत लखनौ सुपर जायंट्स प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. एमआयच्या कर्णधाराने सांगितले की, लखनौविरुद्धच्या या सामन्यात तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. मुंबईने अखेर आपला वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला या सामन्यात खेळण्याची संधी दिली आहे. त्याचवेळी केएल राहुलने सांगितले की, क्विंटन डी कॉकच्या जागी देवदत्त पडिक्कलला संधी मिळाली आहे.
🚨 Toss Update 🚨@mipaltan elect to bowl against @LucknowIPL
Follow the Match https://t.co/VuUaiv5dPT#TATAIPL | #MIvLSG pic.twitter.com/iSYDcNmMtT
— IndianPremierLeague (@IPL) May 17, 2024
MI vs LSG : दोन्ही संघांची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
मुंबई इंडियन्स : ईशान किशन (यष्टीरक्षक), नमन धीर, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, हार्दिक पंड्या (कर्णधार), नेहल वढेरा, रोमॅरियो शेफर्ड, अंशुल कंबोज, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा. ( इम्पॅक्ट सब : रोहित शर्मा, टीम डेव्हिड, शम्स मुलानी, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय)
लखनौ सुपर जायंट्स : केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, अर्शद खान, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान. ( इम्पॅक्ट सब: नवीन-उल-हक, ऍश्टन टर्नर, मणिमारन सिद्धार्थ, प्रेरक मंकड, कृष्णप्पा गौतम )
पावसामुळे हा सामना वाहून गेला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. अशा स्थितीत पावसामुळे लखनौच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याची उरलेली शक्यताही मावळेल. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत पाच सामने झाले आहेत, ज्यामध्ये एलएसजीने चार सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमध्ये वानखेडेवर झालेल्या एकमेव सामन्यातही एलएसजी संघाने बाजी मारली होती. आयपीएल 2024 या मोसमात लखनौ विरुद्ध मुंबई यांच्यात अखेरचा सामना हा 30 एप्रिल रोजी झाला होता. लखनऊने या सामन्यात मुंबईवर 4 विकेट्सने विजय मिळवला होता.
आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेले मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स दोघेही शेवटच्या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेचा शेवट करण्याचा प्रयत्न करतील. मुंबई इंडियन्स बऱ्याच आधी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, तर लखनौ सुपर जायंट्सने शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकला तरी त्यांची अंतिम चारमध्ये पोहोचण्याची शक्यता नगण्य आहे. कारण तीन सामन्यांतील सलग पराभवांमुळे लखनौचे गुणही कमी झाले आणि धावगतीही खालावलेली आहे.
मुंबई इंडियन्स, ज्याने आतापर्यंत 13 सामन्यांपैकी फक्त चार जिंकले आहेत, शुक्रवारी जिंकल्यास दहा गुण मिळतील आणि शेवटच्या स्थानावर जाणे टाळता येईल. कोलकाताकडून 98 धावांनी पराभूत झाल्यानंतर त्यांना सनरायझर्स हैदराबादने 10 गडी राखून पराभूत केले तर त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सनं 19 धावांनी पराभव केला. सलग तीन पराभवानंतर 13 सामन्यातील 12 गुणांसह सातव्या क्रमांकावर असलेल्या लखनौचा निव्वळ रन रेट -0. 787 आहे.
बुमराह पर्पल कॅपच्या शर्यतीत…
हा आयपीएल हंगाम मुंबईचा फास्ट बॉलर बुमराहसाठी खूप चांगला राहिला आहे आणि तो या सामन्यातही चांगली कामगिरी करून पर्पल कॅप परत मिळवण्याचा प्रयत्न करेल. त्याने 13 सामन्यात 20 विकेट घेतल्या असून पर्पल कॅपच्या शर्यतीत तो दुसऱ्या क्रमाकांवर आहे.





