Raghu Sharma Celebration : १५ वर्षांचा संघर्ष अखेर संपला! मुंबईच्या फिरकीपटूने पहिल्याच विकेटनंतर दाखवला ‘तो’ भावनिक संदेश, पाहा VIDEO
Raghu Sharma Celebration : रघु शर्माने आयपीएल कारकिर्दीतील पहिलीच विकेट घेतल्यानंतर केलेला जल्लोष चर्चेचा विषय ठरला आहे, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Raghu Sharma Celebration Video Viral : आयपीएल २०२६ च्या ४७व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यात झालेल्या लढतीत लखनौने २० षटकांत २२८ धावांचा डोंगर उभारला होता. या कठीण सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली असली, तरी ३३ वर्षीय लेगस्पिनर रघु शर्माने आपल्या अचूक आणि प्रभावी गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने ४ षटकांत केवळ ३६ धावा देत १ विकेट घेतली. ही त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलीच विकेट ठरली. यानंतर त्याने केलेला जल्लोष चर्चेचा विषय ठरला आहे.
पदार्पणातच घेतली अक्षत रघुवंशीची विकेट-
रघु शर्माने लखनौचा युवा फलंदाज अक्षत रघुवंशीला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. ही त्याची आयपीएलमधील पहिलीच विकेट होती, ज्याचा त्याने अत्यंत खास पद्धतीने आनंद साजरा केला. विकेट घेतल्यानंतर त्याने आपल्या खिशातून एक पांढरा कागद काढून संपूर्ण स्टेडियमला दाखवला. या कागदावर लिहिलेला संदेश सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
काय लिहिलं होतं त्या कागदावर?
RAGHU SHARMA EMOTIONAL MESSAGE 🥹🚨
“A very painful 15 years
By divine mercy of Gurudev ended today. Thanks Mumbai Indians (Blue and Gold) for giving me this opportunity. Ever grateful.”Jai Sri Ram🧿
A emotional message that Raghu Sharma wrote on the note, which he showed… https://t.co/D05qEbhcC7 pic.twitter.com/VCNjoZMyTz
— Jeet (@JeetN25) May 4, 2026
रघु शर्माने दाखवलेल्या त्या खास कागदावर लिहिले होते: “गुरुदेव की कृपा से दर्द भरे १५ साल आज खत्म हुए. धन्यवाद मुंबई इंडियंस (ब्लू और गोल्ड), मुझे ये मौका देने के लिए, हमेशा आभारी रहूंगा. जय श्री राम.” हा संदेश वाचून त्याच्या १५ वर्षांच्या खडतर संघर्षाची प्रचिती येते.
कोण आहे रघु शर्मा?
🚨 A special moment for Raghu Sharma 💫
He picked up his first-ever IPL wicket today and celebrated it in a unique way pulling out a note to share a glimpse of his journey.#IPL2026 #CricketStories #Cricket pic.twitter.com/hdsQu12wri
— Shehzade (@Shehzade_18) May 4, 2026
मूळचा पंजाबचा असलेला रघु शर्मा ३३ वर्षांचा आहे. तो सुरुवातीच्या काळात एक वेगवान गोलंदाज (पेसर) होता. मात्र, नंतर त्याने लेगस्पिन गोलंदाजीकडे आपला मोर्चा वळवला आणि उत्कृष्ट कामगिरी केली. मुंबई इंडियन्सने २०२५ मध्ये विग्नेश पुथुरच्या जागी त्याला संघात स्थान दिले होते. त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १२ सामन्यांत ५७ विकेट्स, लिस्ट-ए मध्ये १८ विकेट्स आणि टी-२० मध्ये ४ विकेट्स घेतल्या आहेत. सुरुवातीला संधी न मिळालेल्या रघुने अखेर लखनऊविरुद्धच्या सामन्यात आपल्यातील गुणवत्ता सिद्ध केली आहे.





