MI vs LSG : रोहित-रिकल्टनच्या तडाखेबंद भागीदारीने लखनौचा उडवला धुव्वा! मुंबईने नोंदवला तिसरा विजय
MI vs LSG : या विजयासह मुंबईने आपले आव्हान जिवंत ठेवले असले, तरी त्यांना आतापर्यंत ७ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

MI vs LSG Mumbai won by 6 wickets against Lucknow : आयपीएल २०२६ च्या ४७ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) लखनौ सुपरजायंट्सचा ६ गड्यांनी पराभव केला. यासह मुंबई हंगामातील तिसरा विजय नोंदवला आहे. लखनौने दिलेल्या २२९ धावांच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना, मुंबई इंडियन्सच्या सलामीवीरांनी उत्कृष्ट फलंदाजी करत विजय सोपा केला. या विजयासह मुंबईने आपले आव्हान जिवंत ठेवले असले, तरी त्यांना आतापर्यंत ७ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सलामीवीरांची विक्रमी भागीदारी –
लखनौने बोर्डवर २२८ धावांचा डोंगर उभारला होता, मात्र मुंबईच्या रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन या सलामीच्या जोडीने पहिल्याच विकेटसाठी १४३ धावांची तुफानी भागीदारी केली. ही भागीदारी मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील पाचवी सर्वात मोठी भागीदारी ठरली. रिकल्टनने अवघ्या ३२ चेंडूंत ६ चौके आणि ८ षटकार ठोकून २५९.३८ च्या स्ट्राईक रेटने ८३ धावांची खेळी केली, तर हिटमॅन रोहित शर्माने ४४ चेंडूंत ६ चौके आणि ७ षटकारांच्या मदतीने ८४ धावा फटकावल्या.
POV: Enjoying a 𝙎𝙪𝙥𝙚𝙧-𝙃𝙞𝙩 show 🍿
Updates ▶️ https://t.co/elXSOvaeig #TATAIPL | #KhelBindaas | #MIvLSG | @ImRo45 pic.twitter.com/TPUFx2RkKI
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2026
१४३ धावांच्या या धडाकेबाज सुरुवातीनंतर रिकेल्टन आणि रोहित बाद झाले, पण तोपर्यंत मुंबईचा विजय जवळपास निश्चित झाला होता. त्यानंतर इम्पॅक्ट प्लेयर आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी संयम राखून १८.४ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात २२९ धावांचे लक्ष्य गाठले. विल जॅक्स आणि नमन धीर यांनी अखेरीस सामना फिनिश केला.
लखनौची खराब रणनीती –
Different day, same brilliant form! ✨
Ryan Rickelton races to a lightning-fast half-century in just 2️⃣2️⃣ deliveries 👏
Updates ▶️ https://t.co/elXSOvaeig #TATAIPL | #KhelBindaas | #MIvLSG pic.twitter.com/xNnnfE0Vmt
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2026
तत्पूर्वी लखनौसाठी निकोलस पूरनने २१ चेंडूंत ६३ धावा, मिचेल मार्शने ४४, एडेन मार्करमने ३१ आणि हिम्मत सिंहने ४० धावांचे योगदान दिले होते. परंतु, शेवटच्या फलंदाजांचा स्ट्राईक रेट चांगला न राहिल्यामुळे त्यांना अधिक मोठी धावसंख्या उभारता आली नाही. गोलंदाजीत एम. सिद्धार्थने २ विकेट्स घेतल्या, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या पराभवानंतर लखनौ संघाला या हंगामातील सातव्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यामुळे गुणतालिकेवर फारसा परिणाम झालेला नाही.





