IPL 2026 Playoffs : आयपीएल २०२६ प्लेऑफ्सच्या शर्यतीत जबरदस्त चुरस; कोणता संघ मारणार बाजी अन् कुणाचा प्रवास संपुष्टायत येणार? जाणून घ्या
IPL 2026 Playoffs : गुणतालिकेत कोणता संघ कितव्या स्थानी आहे आणि प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकण्यासाठी कोणत्या संघासमोर काय आव्हान असेल? जाणून घेऊया

IPL 2026 Playoffs Equation and Scenario : आयपीएल २०२६ मधील प्लेऑफ्सची शर्यत कमालीची चुरशीची बनली आहे. रविवारी झालेल्या डबल हेडरच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादची सलग पाच विजयांची मालिका खंडीत केली, तर दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सने अव्वल स्थानावरील पंजाब किंग्सला पराभवाचा दणका दिला. यानंतर गुणतालिकेचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे.
पंजाब किंग्स आणि आरसीबी आघाडीवर –
अहमदाबादमधील पराभवानंतरही पंजाब किंग्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. ९ सामन्यांत ६ विजय, २ पराभव आणि एका अनिर्णित सामन्यासह १३ गुणांची कमाई करून त्यांचा नेट रनरेट +०.८५५ आहे. प्लेऑफ्सचे तिकीट पक्के करण्यासाठी त्यांना उर्वरित ५ पैकी केवळ २ सामने जिंकावे लागतील.
🚨 IPL 2026: THE RACE TO THE PLAYOFFS HEATS UP 🚨
The points table is officially split! With the magic 16 in sight, here is where every team stands in the qualification race:
✅THE FRONTRUNNERS:
• PBKS: 13 pts. Almost there. One foot in the playoffs. 👑
• RCB & SRH: 12… pic.twitter.com/Fgl5IiwWSZ
— LUCK7773 (@Luck_7773) May 2, 2026
दुसऱ्या स्थानावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) ९ सामन्यांत ६ विजय मिळवून १२ गुणांची कमाई केली असून त्यांचा नेट रनरेट +१.४२० आहे. त्यांना प्लेऑफ्ससाठी ५ पैकी २ विजय आवश्यक आहेत.
टॉप ५ मध्ये तगडी चुरस –
POINTS TABLE UPDATE
IPL 2026 standings are tightly packed
Small winning streaks can quickly change positions#GTvsPBKS #IPL2026 #Cricket pic.twitter.com/5pMYah8xpS
— MK Sharma ✍️ (@EmediaManoj) May 3, 2026
गुणतालिकेत सनरायझर्स हैदराबाद (६ विजय, १० सामने, १२ गुण, +०.६४४ एनआरआर), राजस्थान रॉयल्स (६ विजय, १० सामने, १२ गुण, +०.५१०) आणि गुजरात टायटन्स (६ विजय, १० सामने, १२ गुण, -०.१४७) हे संघ अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. या तीनही संघांच्या खात्यात समान गुण असल्याने प्लेऑफ्सची स्पर्धा अत्यंत तीव्र झाली आहे. विशेष म्हणजे या तीनही संघाचे प्रत्येकी चार सामने बाकी असून यांना प्लेऑफ्समध्ये पोहोचण्यासाठी फक्त दोन सामने जिंकण्याची गरज आहे.
सीएसके, डीसी आणि केकेआरच्या आशा जिवंत –
चेन्नई सुपर किंग्स (८ गुण), दिल्ली कॅपिटल्स (८ गुण) आणि कोलकाता नाईट रायडर्स (७ गुण) हे संघ अजूनही स्वबळावर प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकून आहेत. मात्र, अव्वल ४ मध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना उर्वरित सामन्यांत विजय मिळवणे गरजेचे आहे.
एमआय आणि एलएसजी तळाला –
तळाच्या लखनौ सुपर जायंट्स (४ गुण) यांच्यासाठी आता प्रत्येक सामना ‘करा किंवा मरा’ असा झाला आहे. लखनौचे ६ सामने बाकी असून त्यांना प्लेऑफ्समध्ये पोहोचण्यासाठी सर्व जिंकणे गरजेचे आहे. मात्र मुंबई इंडियन्सच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. कारण ९ सामन्यानंतर त्यांचे फक्त ४ गुण आहेत. उर्वरित ५ सामने जिंकूनही त्यांचे १४ गुण होतील, त्यामुळे हा संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीन जवळपास बाहेर पडला असून औपचारिकता बाकी आहे





