Fadnavis Government : कोकणातील प्रवास सुलभ करण्याच्या उद्देशाने मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेली मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा तोट्यामुळे अडचणीत आली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Fadnavis Government) सुरुवातीपासूनच या प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याची चर्चा होती. कमी प्रवासीसंख्या आणि प्रचंड इंधन खर्चामुळे ही सेवा सरकारसाठी आर्थिक बोजा ठरत असल्याचे बोलले जात आहे. अखेर तांत्रिक बिघाडाचे कारण देत फेऱ्या थांबवण्यात आल्याने सरकारवर टीका सुरू झाली आहे. (Fadnavis Government) १२ फेऱ्यांत फक्त ८९४ प्रवासी मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-विजयदुर्ग मार्गावर झालेल्या १२ फेऱ्यांमध्ये केवळ ८९४ प्रवाशांनी प्रवास केला, तर अवघी १५४ वाहने वाहतूक करण्यात आली. काही फेऱ्यांमध्ये जहाज अक्षरशः रिकामे धावल्याचेही समोर आले आहे. (Fadnavis Government) विशेष म्हणजे ६२० प्रवासी क्षमतेच्या जहाजात ५ मार्चच्या विजयदुर्ग-मुंबई फेरीत एकही प्रवासी नव्हता. तर १९ मार्चच्या फेरीत केवळ एकच प्रवासी होता. बहुतांश फेऱ्यांमध्ये ३० ते ४० प्रवासीच प्रवास करत होते. (Fadnavis Government) उत्पन्नापेक्षा खर्च अनेकपटीने जास्त या सेवेसाठी ‘इकोनॉमी’ तिकीट दर सुमारे ३ हजार रुपयांपासून सुरू होत होता. सर्व प्रवाशांकडून किमान भाडे आणि वाहन वाहतुकीचे शुल्क मिळून एकूण उत्पन्न ३५ ते ३६ लाख रुपयांच्या आसपास असल्याचा अंदाज आहे. (Fadnavis Government) मात्र एका फेरीसाठी १८ ते २० हजार लिटर इंधन लागत असल्याने केवळ इंधन खर्चच १.१५ ते १.४० कोटी रुपयांच्या घरात जात होता. एकूण खर्च दीड ते पावणेदोन कोटी रुपयांपर्यंत पोहोचत असल्याने हा प्रकल्प मोठ्या तोट्यात गेला. (Fadnavis Government) ‘प्राधान्यक्रमांचा घोळ’ या प्रकल्पावर टीका करत अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव, अक्षय महापदी यांनी सरकारवर निशाणा साधला. “जनतेच्या मूलभूत गरजा आणि प्रलंबित पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून अशा तोट्यातील योजनांवर खर्च करणे म्हणजे प्राधान्यक्रमांचा घोळ आहे,” असे त्यांनी म्हटले. (Fadnavis Government) तोट्याचे आकडे एकूण फेऱ्या : १२ एकूण प्रवासी : ८९४ वाहने : १५४ एका फेरीसाठी इंधन : १८ ते २० हजार लिटर अंदाजित उत्पन्न : ३५ ते ३६ लाख रुपये एकूण खर्च : दीड ते पावणेदोन कोटी रुपये अंदाजित थेट नुकसान : १.१५ ते १.४० कोटी रुपये काय आहे मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा प्रकल्प? मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान प्रस्तावित रो-रो सेवा म्हणजे समुद्रमार्गे प्रवासी आणि वाहन वाहतुकीसाठी सुरू होणारा विशेष फेरी प्रकल्प आहे. या सेवेमुळे कोकणातील प्रवास अधिक जलद, स्वस्त आणि सोयीस्कर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. (Fadnavis Government) या प्रकल्पात प्रवासी आपल्या कार, दुचाकी किंवा इतर वाहनांसह थेट फेरीबोटीतून प्रवास करू शकतील. सध्या मुंबईहून विजयदुर्गपर्यंत रस्त्याने प्रवास करण्यासाठी 12 ते 14 तास लागतात. मात्र रो-रो सेवेमुळे हा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. (Fadnavis Government) हा प्रकल्प विशेषतः कोकणातील पर्यटन, मत्स्यव्यवसाय आणि स्थानिक व्यापार वाढवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. गणेशोत्सव आणि सुट्ट्यांच्या काळात होणारी महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासही मदत होऊ शकते. (Fadnavis Government) या सेवेसाठी अत्याधुनिक फेरीबोटी, जेट्टी आणि टर्मिनल उभारण्याची योजना आहे. मात्र प्रकल्पाच्या खर्च, व्यवहार्यता आणि प्रवासी प्रतिसादाबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित होत असल्याने हा प्रकल्प चर्चेत राहिला आहे. (Fadnavis Government)