Devendra Fadnavis : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! रायगडमध्ये ॲमिटी विद्यापीठासाठी 15 एकर जमीन
Devendra Fadnavis : सरकारने मंजूर केलेल्या या जमिनीवर शैक्षणिक संकुल, वसतीगृहे, क्रीडांगणे, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि इतर शैक्षणिक सुविधा उभारल्या जाणार आहेत.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. Amity University च्या विस्तारासाठी रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात जमीन उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, ॲमिटी विद्यापीठाची मूळ संस्था असलेल्या Ritnand Balved Education Foundationला मौजे भाताण (ता. पनवेल, जि. रायगड) येथील सुमारे १५ एकर जमीन देण्यात येणार आहे. ही जमीन विशेष बाब म्हणून वर्ग-२ धारणाधिकाराच्या स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार असून, त्यासाठी कब्जे हक्काची रक्कम आकारली जाणार आहे. (Devendra Fadnavis)
सध्या ॲमिटी विद्यापीठामध्ये १८ विविध शाखांमधून शैक्षणिक अभ्यासक्रम राबवले जात आहेत. येथे पाच हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून, वाढत्या शैक्षणिक गरजा आणि नव्या अभ्यासक्रमांच्या विस्तारासाठी अतिरिक्त जागेची मागणी संस्थेकडून करण्यात आली होती.
सरकारने मंजूर केलेल्या या जमिनीवर शैक्षणिक संकुल, वसतीगृहे, क्रीडांगणे, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि इतर शैक्षणिक सुविधा उभारल्या जाणार आहेत. पनवेल तालुक्यातील भाताण येथील विविध सर्वे क्रमांकांतील जमीन या प्रकल्पासाठी देण्यात येणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली.
हेही वाचा : Saif Ali Khan : ..म्हणून प्रोडक्शन हाऊस बंद केलं; सैफ अली खानचा खुलासा म्हणाला “आमचाही एक चांगला काळ…”





