पुणे – मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर केमिकल घेऊन जाणारा टँकर पलटी झाला आहे. यामुळे महामार्गावर पाच ते सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांग्या लागल्या आहेत. बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्यावर टँकरमधील केमकील सांडल्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महामार्ग पोलिसांनी धाव घेतली असून आहे. याशिवाय केमिकल आणि अपघातग्रस्त वाहन हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक लोणावळामार्गे वळवण्यात आली आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एक केमिकल टँकर पलटी झाले. टँकर पलटी झाल्यामुळे केमिकल वाहू लागले असून रस्ता निसरडा झाला आहे. त्यामुळे अनेक वाहन घसरू लागली आहेत. या अपघातामुळे पुण्यातून जाणारी वाहतून धीम्या गतीने सुरु आहे तर मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प होती. आता ती लोणावळामार्गे वळवण्यात आली आहे.