Mumbai Fire | मुंबईतील ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला भीषण आग लागली आहे. आज मंगळवारी 11 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास या फर्निचर मार्केट आणि लाकडी गोदामाला भीषण आग लागल्याने यात 20 ते 25 दुकानं जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाचे 6 बंब घटनास्थळावर पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ओशिवरा येथील हे फर्निचर मार्केट लाकडी आणि शोभेच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी शेकडो लाकडी वस्तूंची दुकानं आहेत. त्यामुळे आग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे आणि परिसरात भीतीचं वातावरण आहे. आतापर्यंत 10 ते 12 सिलेंडर या आगीमध्ये ब्लास्ट झाले आहे. Mumbai Fire |
जोगेश्वरी पश्चिम येथील रिलीफ रोडवर असलेल्या कंपाऊंडमध्ये सकाळी साडे ११ च्या सुमारास ही आग लागली. जवळपास 6 अग्निशमन दलाच्या गाड्या, 6 जंबो टँकर, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. Mumbai Fire |
सुदैवाने आतापर्यंत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. पण शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, आगीच्या घटनेमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. याठिकाणची वाहतूक संथ गतीने सुरू आहे. Mumbai Fire |
हेही वाचा :