वांद्र्यातील लिंक स्केअर मॉलला भीषण आग; अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल

Mumbai Fire | मुंबईतील वांद्रे परिसरातील लिंक स्क्वेअर मॉलला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे 4 वाजता या मॉलमधील एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
या मॉलमध्ये अनेक रेस्तराँ असून या रेस्तराँच्या किचनमध्ये बरेच गॅस सिलिंडर आहेत. त्यामुळे स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. शोरूमचा वरचा भाग आगीत पूर्णपणे जळून खाक झाला असून शोरूममधून आगीच्या मोठमोठ्या ज्वाला आणि धुराचे लोट बाहेर पडत आहेत.
#WATCH | Maharashtra | A fire broke out at a showroom and has now engulfed the entire mall in Mumbai’s Bandra. Fire tenders are present at the spot, and operations are underway to douse the fire. No causality has been reported.
More details awaited. pic.twitter.com/MC4Q9iuQFh
— ANI (@ANI) April 29, 2025
;
दरम्यान, या आगीबाबतचं वृत्त समजताच माजी आमदार झीशान सिद्दिकी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ते म्हणाले, “मला चार वाजता या घटनेची माहिती मिळाली तेव्हा आग फार मोठी नव्हती. मात्र आता आग मॉलमध्ये पसरली आहे. त्यावेळी पोलीस, अग्निशमन दल कोणीही येथे नव्हते. सहा वाजता सर्वजण इथे दाखल झाले.”
“आग लागली तेव्हा काही सुरक्षा कर्मचारी तिथे होते. परंतु, त्यांना तिथे उपलब्ध असलेली आग विझवण्याची उपकरणे हाताळता येत नसल्याने ते काहीच करू शकले नाहीत. परिणामी आग आणखी वाढली. ही खूप दुर्दैवी बाब आहे,” असे झीशान सिद्दिकी यांनी सांगितले. Mumbai Fire |
दरम्यान, आगीमध्ये मॉलचे मोठे नुकसान झाले आहे. मॉल परिसरात वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीमध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी अथवा कोणी जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. तसेच आगीचे कारणही स्पष्ट झालेले नाही. Mumbai Fire |
हेही वाचा:
पाकिस्तानच्या काड्या सुरूच ; सीमेवर रात्रभर गोळीबार करत पाचव्या दिवशीही युद्धबंदीचे उल्लंघन





