Mumbai : जोगेश्वरीतील बिझनेस सेंटरला भीषण आग; काही जण अडकल्याची शक्यता

Mumbai Fire News | मुंबईतील जोगेश्वरी पश्चिमेकडील जेएनएस बिझनेस सेंटरला आज सकाळी 10.50 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या इमारतीमध्ये काहीजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या आगीत कोणीही मृत्युमुखी पडले नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या भीषण आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
#WATCH | Maharashtra: A massive fire blazes through JMS Business Centre in Jogeshwari West area of Mumbai. Firefighting operations are underway here. People seen stranded on the top floor of the building. pic.twitter.com/idbhnupOZT
— ANI (@ANI) October 23, 2025
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. इमारतीत मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट कार्यालये आहेत. Mumbai Fire News |
दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Mumbai Fire News |
हेही वाचा:
IND vs AUS : रोहितची दमदार खेळी, शतक हुकले पण ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय





