Vivek Passed Away : कलाविश्वावर शोककळा…! ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन

Veteran actor Vivek Lagoo passes away : कलाविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. जेष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे. २० जून गुरूवारी सायंकाळी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. आज शुक्रवार २० जून रोजी त्यांच्या पार्थिवावर अंधेरीतील ओशिवरा येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. विवेक लागू यांच्या मृत्यूची बातमी सर्वप्रथम विकी लालवाणी यांनी सोशल मीडियावर शेअर केली.
विवेक लागू हे नाव मराठी चित्रपट आणि टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध नाव होते. त्यांचा जन्म पुण्यात झाला होता. त्यांना लेखन आणि दिग्दर्शनाची आवड असल्याने त्यांनी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात रंगभूमीवरून केली. विवेक लागू हे ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते. तर अभिनेत्री मृण्मयी लागू ही त्यांची मुलगी आहे. अनेक प्रसिद्ध नाटक आणि चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांना काही नाटकांसाठी पुरस्कार देखील मिळालेले आहेत.
‘व्हॉट अबाऊट सावरकर’, ‘अग्ली’, ’31 दिवस’ या चित्रपटांममध्ये त्यांनी काम केले आहे. याशिवाय मराठीतील अत्यंत लोकप्रिय अशा ‘चार दिवस सासूचे’, ‘हे मन बावरे’ या गाजलेल्या मालिकांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. विवेक लागू आणि रीमा लागू यांचे १९७८ मध्ये लग्न झाले. मात्र, काही काळानंतर दोघेही विभक्त झाले. 2017 मध्ये जेष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
हेही वाचा: Pune District : डिंभे धरण क्षेत्रात कमी पावसामुळे पाणी पातळीत संथ गतीने वाढ





