Sanjay Raut : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होण्याअगोदरच भाजपचे विविध ठिकाणी ४० हून अधिक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. निडणूक होण्याअगोदर भाजपला मिळालेले यश चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक्सवरून त्यांचा मुलगा नील सोमय्या ही निवडणूक बिनविरोध जिंकणार असल्याच्या आशयाचे ट्वीट केले होते. त्यानंतर आता उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली आहे. मुलुंडचे ना*** पोपटलाल बिनविरोध… बिनविरोध…. बिनविरोध…. असे नाचायला लागले असल्याचे संजय राऊत म्हणाले. नेहमीप्रमाणे १०७ क्रमांकाचा वार्ड देखील त्या घोटाळ्यात सामील झाला. त्यांनंतर हे मुलुंडचे ना*** पोपटलाल बिनविरोध बिनविरोध बिनविरोध असे नाचायला लागले. दिनेश जाधव यांनी तिथे अर्ज भरून ठेवला होता. त्यांचा अर्ज कायम आहे. त्यांना मशाल चिन्ह मिळू शकले नाही. त्यांना दुदर्शन चिन्ह मिळाले आहे. पण लढाई काटे की होणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. थोडक्यात सोमय्यांचा बिनविरोध निवडणुकीच्या दाव्यावर राऊतांनी आक्षेप नोंदिवला आहे. सोमय्यांवर आरोप किरीट सोमय्या शिवसेना किंवा आमचे शत्रू नसून ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत. महाराष्ट्राच्या दुश्मनांना भाजप निवडणुकीच्या रिंगणात आणत असेल तर भारतीय जनता पक्षाचे मनसुबे स्पष्ट होत आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. किरीट सोमय्यांची भूमिका महाराष्ट्र विरोधी आहे. त्यांनी शालेय शिक्षणात मराठी सक्तीला विरोध केला होता. त्यासाठी ते कोर्टात गेले होते. मग शेवटी…. मुलुंडचा वार्ड क्रमांक १०७ त्या जागेचा हट्ट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने केला. आम्ही त्यांना सांगितलं ती जागा अत्यंत नाजूक आहे. आम्हाला ती लढणं गरजेचं आहे. आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत आपण सगळे मिळून ती जागा जिंकू, मग शेवटी नाईलाजाने ती जागा त्यांना दिली, असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. महायुतीचे मुंगळे जे.. मुंबईवर गेल्या साठ वर्षांपासून ठाकरेंचं राज्य आहे. एवढी मोठी मुंबई आहे पण शिवतीर्थला एक महत्व आहे, त्यामुळेच हे महायुतीचे मुंगळे जे सत्तेच्या गुळाला चिटकून बसलेले आहेत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. पुढे ते म्हणाले, त्यांचा प्रयत्न आणि डावपेच सुरू आहे की आम्हाला शिवतीर्थावर सभा घेता येऊ नये, पण आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून मागणी केलेली आहे आणि त्या संदर्भात निर्णय येईल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. हेही वाचा : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याला अटक; लग्नाच्या काही दिवसांतच ठोकल्या बड्या