‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याला अटक; लग्नाच्या काही दिवसांतच ठोकल्या बड्या

Jay Dudhane | ‘बिग बॉस मराठी’ सीजन ३ चा उपविजेता आणि अभिनेता जय दुधानेला अटक करण्यात आली आहे. मुंबई विमानतळळा जवळ पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. ५ कोटींच्या फसवणूक प्रकरणी पोलिसांनी जयला लग्नाच्या 11 दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली आहे.
जयने बनावट कागदपत्रे तयार करून काही दुकानं बेकायदेशीरपणे व्यक्तींना विकल्याचा आरोप आहे. यामुळे अनेक खरेदीदारांचं आर्थिक नुकसान झालं आहे. या प्रकरणात जय दुधाणेसह त्याचे आजी-आजोबा, आई आणि बहिणींचाही FIR मध्ये समावेश आहे. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. Jay Dudhane |
View this post on Instagram
कोण आहे जय दुधाणे?
जय दुधाणे सर्वांत आधी ‘स्पिट्सविला 13’ या रिअॅलिटी शोमुळे प्रकाश झोतात आला होता. या शोचं विजेतेपद त्याने पटकावलं होतं. त्यानंतर त्याने बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता आणि इथे तो उपविजेता ठरला. तो ‘येडं लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
जय दुधाणे हा ठाण्यातील फिटनेस ट्रेनर, उद्योजक आणि अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. 24 डिसेंबर 2025 रोजी जयने गर्लफ्रेंड आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटीलशी लग्नगाठ बांधली होती. ठाण्यातच हा लग्नसोहळा पार पडला होता. मात्र आता त्याच्यावर अटकेची कारवाई झाली. Jay Dudhane |
हेही वाचा:
ऐन निवडणुकीच्या काळात पुण्यात खळबळ! टार्चरला कंटाळून अपक्ष उमेदवाराने जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये…





