MS Dhoni Net Practice : CSK चाहत्यांसाठी ‘गुड न्यूज’! चेपॉकवर ‘थाला’चं दर्शन; पंजाबविरुद्धच्या सामन्यात खेळणार का? पाहा VIDEO
MS Dhoni Net Practice : दुखापतीमुळे मैदाबाहेर असलेल्या एमएस धोनीने अखेर बॅट हातात घेतली असून, त्याच्या पुनरागमनाचे संकेत मिळाले आहेत.

MS Dhoni Net Practice ahead CSK vs PBKS IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर सीएसकेच्या गोटातून चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे मैदाबाहेर असलेल्या एमएस धोनीने अखेर बॅट हातात घेतली असून, त्याच्या पुनरागमनाचे संकेत मिळाले आहेत.
आयपीएलच्या १९ व्या हंगामातील पहिल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईला ८ गडी राखून पराभूत केले. या पराभवामुळे चेन्नईचे चाहते नाराज असतानाच, आता कर्णधार एमएस धोनीच्या फिटनेसबद्दल मोठे अपडेट समोर आले आहे. ‘काफ स्ट्रेन’मुळे धोनी सुरुवातीच्या दोन आठवड्यांसाठी बाहेर असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, १ एप्रिल रोजी चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सराव सत्रात धोनीने चक्क फलंदाजीचा सराव केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नेट्समध्ये धोनीचा जलवा –
Kodiyil Oruvan! 🦁💛#WhistlePodu #Yellove pic.twitter.com/SuztJYGNzr
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 1, 2026
राजस्थानविरुद्धच्या सामन्यासाठी धोनी संघासोबत गुवाहाटीला गेला नव्हता, तो चेन्नईतच रिहॅब पूर्ण करत होता. मात्र, ३ एप्रिल रोजी पंजाब किंग्सविरुद्ध होणाऱ्या घरच्या मैदानावरील सामन्यापूर्वी धोनी नेट्समध्ये फलंदाजी करताना दिसला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, धोनी अपेक्षेपेक्षा लवकर तंदुरुस्त होऊन मैदानात परतेल, अशी आशा चाहत्यांना लागली आहे.
पंजाब किंग्सचे ‘कठोर’ आव्हान –
Look He Is Back 💛🥳🥳 pic.twitter.com/AYQwidD3zl
— Noor Ahmad Nation 🇦🇫 (@kohinor_7) April 1, 2026
३ एप्रिल रोजी चेन्नईचा सामना पंजाब किंग्सशी होणार आहे. आकडेवारी पाहिली तर पंजाबने चेन्नईला नेहमीच कडवी झुंज दिली आहे. या दोन संघांमध्ये आतापर्यंत ३२ सामने झाले असून दोघांनीही प्रत्येकी १६-१६ सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे, चेन्नईच्या घरच्या मैदानावर (चिदंबरम स्टेडियम) झालेल्या ९ सामन्यांपैकी पंजाबने ५ तर चेन्नईने ४ सामने जिंकले आहेत. घरच्या मैदानावरील हा खराब रेकॉर्ड सुधारण्यासाठी धोनीचे संघात असणे चेन्नईसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.





