Sunetra Pawar’s Post : ‘आई…आज…,’; सुनेत्रा पवारांची हृदयस्पर्शी पोस्ट, ‘तो’ खास फोटो शेअर करत काय म्हणाल्या?
Sunetra Pawar's Post : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी इंन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Sunetra Pawar’s Post : आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्षाच्या सण असून, राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. चैतन्याचे वातावरण सगळीकडे पाहायला मिळत आहे. या सणाच्या निमित्ताने नवीन खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. यामध्ये सोनं, चांदी, नवीन कार आदी मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.
राजकारणात सक्रीय असलेले राजकीय मंडळी देखील या सणानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देताना दिसतात. राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राज्यातील नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून गुडीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Sunetra Pawar’s Post
मात्र, त्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियाच्या इंन्स्टाग्रामवर केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या सासूबाई आशाताई पवार आणि त्या स्वतः असा एकत्रित असतानाचा फोटो पोस्ट केला आहे. Sunetra Pawar’s Post
या फोटोला पोस्ट करण्याचे निमित्त देखील खास आहे. याचे कारण म्हणजे आशाताई पवार यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सुनेत्रा पवार यांनी दोघी एकत्र असलेला फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला ‘आई…. आज तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असे कॅप्शन देत वाढदिवसाच्या शुभेच्छा आशाताई पवार यांना दिल्या आहेत. Sunetra Pawar’s Post
या पोस्टमधून सुनेत्रा पवार आणि आशाताई पवार यांच्यातील नाते सासू सून नसून आई मुलगी असल्याचे दिसते. या पोस्टला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. Sunetra Pawar’s Post
View this post on Instagram
सुनेत्रा पवार यांनी अनेकदा बोलताना त्यांचं आणि आशाताई पवार यांचं नातं हे सासू-सूनपेक्षा आई-मुलगीसारखं आहे. घरातील निर्णयांमध्ये त्या सासूबाईंचा सल्ला घेतात, तर आशाताईही त्यांना नेहमी पाठिंबा देताना दिसतात. असे वेळोवेळी सांगितले आहे. त्याची प्रचिती या पोस्टमधून येते. Sunetra Pawar’s Post
राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात अजित पवार यांच्या प्रवासात आशाताई पवार यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांच्यासाठीही त्या प्रेरणास्थान ठरल्या आहेत. Sunetra Pawar’s Post



