Deepika Padukone : स्टायलिश दीपिका! ब्लॅक ड्रेसमधील अंदाज पाहून चाहते फिदा; नवीन फोटोशूटची जोरदार चर्चा
Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Deepika Padukone : बॅालीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. दीपिका आठ तासांच्या शिफ्टच्या विधानामुळे चर्चेत आली होती. त्यानंतर अनेक अभिनेत्रींनी तिच्या मागणीला पाठिंबा देखील दर्शवला होता. याच मागणीमुळे अॅनिमल फेम दिग्दर्शकाच्या एका मोठ्या चित्रपटातून दीपिका बाहेर पडली. याशिवाय दीपिका सोशल मीडियावरील तिच्या फोटोमुळे चर्चेत असते.
नुकतेच दीपिकाने नवीन फोटोशूटचे फोटो तिच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमधील ब्लॅक ड्रेसमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस अवतार पाहून फॅन्स फिदा झाले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचे सौंदर्य खुलून दिसत आहे. तिच्या या फोटोंने फॅन्सना वेड लावले आहे. कमेट्ंसमध्ये चाहत्यांकडून भरभरून प्रेम व्यक्त केले जात आहे.
View this post on Instagram
दीपिकाने शेअर केलेल्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, दीपिकाने ब्लॅक बॉडीकॉन ड्रेस परिधान केला असून त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीने मिनिमल मेकअप आणि स्लीक बन हेअरस्टाई करून आपला लूक पूर्ण केला आहे. या लूकमध्ये तिने वेगवेगळ्या अंदाजात भरपूर पोज दिल्या असून, तिच्या प्रत्येक अंदाजावर फॅन्स फिदा झाले आहेत.
हे फोटोशूट समोर आल्यानंतर चाहत्यांनी दीपिकाच्या फोटोंवर भरभरून कमेंट्स करत कौतुक केले आहे. या कमेंट्समध्ये तिला कोणी ‘ग्लॅमरस दिवा’ म्हणत आहे, तर कोणी ‘स्टनिंग’ अशी प्रतिक्रिया देत आहे. दीपिकाच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ती दिग्दर्शक अॅटलच्या आगामी चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय पठाण २, किंग, कल्की २ यासारखे काही महत्वाच्या चित्रपटात दीपिका झळकणार आहे.
हेही वाचा : Ranbir Kapoor : रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपट ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री





