Priyanka Chopra : बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिने अलीकडेच सोशल मीडिया इंन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका स्टोरीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. साधी वाटणारी ही स्टोरी प्रत्यक्षात तिच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण बदल दर्शवते. प्रियंकाने आपल्या स्टोरीमध्ये लिहिले, “माझा विश्वासच बसत नाही. जी गोष्ट माझ्या बालपणी माझ्यासाठी शिक्षा होती, ती आता माझ्या आयुष्याचे ध्येय बनली आहे. जसे की भाज्या खाणे, घरी राहणे, दिवसा छोटी डुलकी घेणे आणि लवकर झोपणे.” एकप्रकारे प्रियंका चोप्राने स्टोरीमधून लाइफस्टाइलचा खुलासा केला आहे. Priyanka Chopra या स्टोरीमधून प्रियंकाच्या जीवनशैलीत झालेला बदल स्पष्टपणे दिसून येतो. फिटनेस आणि आरोग्याबाबत आधीपासूनच जागरूक असलेली प्रियंका आता अधिक संतुलित आणि हेल्दी लाइफस्टाइलकडे वळल्याचे दिसते. दरम्यान, तिच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ती ‘वाराणसी’ या पॅन-इंडिया सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती दमदार भूमिकेत पाहायला मिळणार असून तिच्यासोबत दाक्षिणात्य स्टार कलाकार महेश बाबू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यामुळे चाहत्यांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. Priyanka Chopra : “बालपणीची शिक्षा आज झाली सवय”; प्रियंका चोप्राचा लाइफस्टाइल खुलासा चर्चेत या सिनेमाचे दिग्दर्शन एस.एस. राजामौली करत असून, सिनेमाचे अंदाजे बजेट बाराशे ते चौदाशे कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर सिनेमाविषयी उत्कंठा वाढली आहे. ‘बाहुबली’सारख्या भव्य सिनेमांमुळे ओळखले जाणारे राजामौली यांच्याकडून प्रेक्षकांना या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अभिनेत्री प्रियंका चोप्रा भारतातील सर्वात यशस्वी आणि जागतिक स्तरावर प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. केवळ बॉलिवूडपुरतेच मर्यादित न राहता तिने हॉलीवूडमध्येही आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. हेही वाचा : US Iran War: ‘मोदींना धक्का, ५६ इंची छाती…’ ; अमेरिका-इराण शस्त्रसंधीमधील पाकिस्तानच्या भूमिकेवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया