Sanjay Raut on Captain Kharat Case: नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याला बलात्कार आणि भोंदूगिरी प्रकरणी अटक झाल्यानंतर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. चाकणकर यांनी याच अशोक खरातचे पाद्यपूजन केल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणी उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. रूपाली चाकणकर यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्याची मागणी संजय राऊत यांनी केली. पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात लक्ष घालण्याची मागणीही केली आहे. Sanjay Raut on Captain Kharat Case rupali chakankar नेमकं काय म्हणाले संजय राऊत ? Sanjay Raut on Captain Kharat Case “रुपाली चाकणकर या मूर्ख आहेत. त्या खोटं बोलत आहेत. त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राहूच नये. त्यांच्यात थोडी जरी नैतिकता असेल तर त्यांनी पद सोडले पाहिजे. प्रकरणात वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न येतो कुठे? एका महिलेने हा सर्व प्रकार सहन न झाल्याने तक्रार दिली. तर चाकणकर यांनी तक्रार दाखल न करण्यासाठी अनेकांवर दबाव आणला,” असाही आरोप संजय राऊतांनी केला. रुपाली चाकणकर यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यांना कोण आणि का वाचवतंय हा प्रश्न मला पडला आहे. त्या नाशिकच्या भोंदूबाबाने अनेक महिलांवर अत्याचार केले. महिला आयोगाच्या अध्यक्ष या भोंदूबाबाचे पाद्यपूजन करतात आणि गृहमंत्री डोळे बंद करत बसले आहेत, अशी टीकाही राऊतांनी केली. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्याची संजय राऊतांची मागणी Sanjay Raut on Captain Kharat Case शासनातील मोठ्या पदावरील व्यक्ती मग त्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा असू देत अथवा मंत्री, आमदार हे सगळे अंधश्रद्धेने त्या बाबाची पूजा करतात. कोणी जादूटोण्याला तिथं बसलं आहे. त्यांच्यासोबत ज्यांची ज्यांची छायाचित्र आले आहेत. त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल केले पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. अशोक खरात प्रकरण काय आहे? Sanjay Raut on Captain Kharat Case अशोक खरात हा निवृत्त मर्चंट नेव्ही अधिकारी असून गेल्या काही वर्षांपासून तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जाऊ लागला होता. अनेक मोठे राजकीय नेते, अधिकारी आणि कलाकार मंडळी त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असत. मात्र, नाशिकमधील एका ३५ वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट १ ने १८ मार्च रोजी पहाटे ३ वाजता त्याला अटक केली. नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. खरातच्या ताब्यातून पोलिसांनी एक पेनड्राइव्ह जप्त केला असून त्यात तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हेही वाचा: mojtaba khamenei threat: लारीजानी यांच्या मृत्यूमुळे इराणमध्ये उद्रेक ; मोजतबा खामेनी यांची अमेरिका-इस्रायलला आतापर्यंतची सर्वात मोठी धमकी